‘नीयत’ चित्रपटाचा टीजर आणि पोस्टर प्रदर्शित

विद्याच्या प्रत्येक सिनेमात प्रेक्षकांना तीच एक वेगळचं रूप पहायला मिळतं. मगं ती 'कहानी' मधली विद्या बागची असो किंवा मग 'डर्टी पिक्चरची' रेश्मा असो किंवा नुकताच रिलीज झालेल्या 'जलसा' चित्रपटातील पत्रकार 'माया' असो. अशातच आता तिचा नवीन आगामी चित्रपट 'नीयत' (Neeyat) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘नीयत’ चित्रपटाचा टीजर आणि पोस्टर प्रदर्शित

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिला कोण ओळखत नाही. विद्या बालन नेहमी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मान जिंकत असतेच.परंतु ती अजुनही एका कारणासाठी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे तिच्या साड्या. आणि तिला आपण नेहमी कोणत्याही कार्यक्रमाला बघीला तर तिचा साड्यांवरचे प्रेम दिसून येत. आणि जास्त करून आपल्याला ती साड्यांमध्येच बघायला मिळते. तर विद्या बालन हिचे भूल भूलैय्या, कहानी हे तिचे चित्रपट प्रेक्षकांनकडून खूप पसंत करण्यात आले. विद्याने आतापर्यंत वेगळ्या ढाकणीच्या भूमिका साकारल्या आहेत. विद्याच्या प्रत्येक सिनेमात प्रेक्षकांना तीच एक वेगळचं रूप पहायला मिळतं. मगं ती ‘कहानी’ मधली विद्या बागची असो किंवा मग ‘डर्टी पिक्चरची’ रेश्मा असो किंवा नुकताच रिलीज झालेल्या ‘जलसा’ चित्रपटातील पत्रकार ‘माया’ असो. अशातच आता तिचा नवीन आगामी चित्रपट ‘नीयत’ (Neeyat) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

विद्यानं सोशल मीडियावर (social media)नीयत या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर शेअर केला आहे. यामध्ये असलेलं तीच लूक पाहून अनेकांचा या चित्रपटाकडे बघण्याचा कल वाढलेला आहे . प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. नीयत हा एका मर्डर मिस्ट्रीवर (murder mistry)आधारित सिनेमा असणार आहे. या चित्रपटाची कथा आपल्याला एका डिटेक्टिव्ह पात्राभोवती (विद्या बालन) फिरताना दिसेल.या चित्रपटात विद्या बालनसोबत राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपानिता शर्मा, प्राजक्ता कोळी, शशांक अरोरा हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन (director)हे अनु मेनन यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती (producer) ही विक्रम मल्होत्रा ​​यांनी केली आहे.

नीयत चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन विद्यानं कॅप्शनमध्ये (caption)लिहिलं आहे की, ही आहे मीरा राव, क्लासिक मर्डर मिस्ट्रीचा नॉट सो क्लासिक डिटेक्टिव्ह. विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला ‘नीयत’ हा चित्रपट ७ जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. विद्यानं नीयत चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरला तिने कॅप्शन (caption) देत , रहस्य आणि विविध हेतूंचे जग तुमच्या भेटीस येणार आहे. असे लिहले आहे. २०१९ मध्ये तिचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिचा एकही चित्रपट आला नाही. आता या चित्रपटाच्या माध्यमातून विद्या ४ वर्षानंतर चित्रपटसृष्ट्टीत पुन्हा कमबॅक (comeback) करणार आहे.

 

हे ही वाचा:

Ashadhi Wari, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने केला आज २० दिवसांचा टप्पा पूर्ण

मुंबईमध्ये ईडीचे १५ ठिकाणी छापे, संजय राऊत यांच्या मित्रावर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version