spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नेहाच्या आधीच्या नवऱ्याची मालिकेत होणार एन्ट्री प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका

चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिली होती ती म्हणजे नेहाच्या आधीच्या पतीची भूमिका कोणता अभिनेता साकारणार ? आता यावरून पडदा उठला आहे. अलीकडेच तो अजूनही बरसात आहे मालिकेत विरोधी भूमिकेत दिसला होता.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यश आणि नेहाचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. मालिकेत गृहप्रवेशावेळी आजोबांनी लॉकरच्या चाव्या नेहाकडे दिल्या आणि यापुढे घरातील महत्वाचे निर्णय घेण्याची जबादारी तिच्यावर सोपवली. जेणेकरून ती घरासाठी योग्य निर्णय घेईल. मात्र सिम्मी काकू नेहकडून ती चावी घेऊन त्याची डुप्लिकेट चावी बनवून घेतात. त्यामुळे मालिकेत पुढे सिम्मी काकू ने घातलेला घोळ नेहा ला निस्तरावा लागणार असल्याची शक्यता आहे. त्यात नेहा – यश च्या लग्नात नेहाच्या आधीच्या पती ची हलकी झलक पहायला मिळाली होती. पण त्याचा पूर्ण चेहरा दाखवला नव्हता.

मालिकेच्या शनिवारच्या भागात नेहा चा आधीचा नवरा पॅलेस वर आलेला दाखविण्यात आले. चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिली होती ती म्हणजे नेहाच्या आधीच्या पतीची भूमिका कोणता अभिनेता साकारणार ? आता
यावरून पडदा उठला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता डॉक्टर निखिल राजेशिर्के ही भूमिका साकारतोय.
नेहाचा पूर्वीचा पती पत्रकार बनून तो यश आणि नेहाच्या लग्नात हजर झाला होता. नेहासोबतचा फोटो त्याने गिफ्ट म्हणून एका बॉक्समध्ये ठेवला होता मात्र नंतर त्याने स्वतःचा फोटो फाडून केवळ नेहाचाच फोटो त्यात ठेवला होता. हे गिफ्ट सिम्मी काकूंच्या नजरेत आल्याने त्यांना या फोटोवर शंका आली होती. अर्थात सिम्मी काकू या फोटोवरून नक्कीच काहीतरी घडवून आणणार हे नक्की.
अभिनेता निखिल राजेशिर्के ने मराठी चित्रपट, मालिका तसेच अनेक नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बालमोहन विद्यामंदिर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले तर माटुंगा येथील रुईया कॉलेजमधुन त्याने पदवी प्राप्त केली. निखिलने कॉलेज मध्ये एकांकिका व नाट्यस्पर्धामध्ये भाग घेतला होता. अलीकडेच तोअजूनही बरसात आहे मालिकेत विरोधी भूमिकेत दिसला होता.

Latest Posts

Don't Miss