spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शेजाऱ्यांची जगावेगळी प्रेम कथा ‘नेबर्स’ चित्रपट; २३ सप्टेंबरपासून सिनेमागृहात

प्रेम आणि ताऱ्यांनी वेढलेल्या, एकाच मार्गाने प्रवास करणाऱ्या दोन शेजाऱ्यांची एक जगावेगळी प्रेम कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

प्रेम आणि ताऱ्यांनी वेढलेल्या, एकाच मार्गाने प्रवास करणाऱ्या दोन शेजाऱ्यांची एक जगावेगळी प्रेम कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘कल्पना रोलिंग पिक्चर्स प्रौडक्शन’ निर्मित आणि ‘मिठुवाला प्रौडक्शन्स’ यांचे सादरीकरण असलेल्या ‘नेबर्स ‘ हा चित्रपट २३ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)


दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर छायालेखनाची महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद यांनी स्वरसाज चढविला आहे तसेच पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून चित्रपटाची तांत्रिक बाजू विशाल तळकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय), आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Music Marathi (@zeemusicmarathi)

विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृतिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जवादे, शैलेश दातार, नेहा बाम , अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एक रहस्यमय प्रेम कथा चित्रित करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

हे ही वाचा:

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

पहिल्यांदाच थेट जनतेमधून सरपंचांची निवड ; सत्तांतरानंतरचा पहिलाच गुलाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss