spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मलायका अरोराचा ड्रेस पाहून नेटकऱ्यानी केले ट्रॉल

अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) हे कायम चर्चेत असते. मलायका ही तिच्या स्टाइल स्टेटमेंट , फिटनेस आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. मलायका तिच्या फॅशनने सर्वांनाच भुरळ पाडत असते. यावेळी मात्र मलायकाला तिच्या आऊटफिटमुळे प्रचंड त्रास झाला आहे. एक पार्टीमध्ये मलायकाने घातलेल्या आऊटफिटवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

अलीकडेच झालेल्या फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या बर्थडे पार्टीला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यावेळेस दभिनेत्री मलायका अरोराने देखील या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. परंतु या पार्टीत मलायकानं हाय-फॅशन ब्रॅन्ड बॅलेंसिएगाचा आऊटफिट घातला होता. पण या ब्रॅन्डच्या ड्रेसमध्ये मलायकाला पाहिल्यावर लोकतिच्यावर प्रचंड संतापले आहेत. कारण मालयकाने बॅलेंसिएगा (Balenciaga) ब्रॅण्डचा ड्रेस घातला होता, या बॅलेंसिएगाच्या एका नुकत्याच पार पडलेल्या अॅड कॅम्पेनवर लहान मुलांना सेक्सुअलाइज करण्याचा आरोप लावला गेला होता. या ब्रॅन्डच्या त्या अॅड कॅम्पेनवरनं खळबळ उडाली होती.यामुळे मलायकाला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मनीष मल्होत्राच्या या प्रतीचे व्हिडीओ आणि फोटोस मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. तर मालयकाने बॅलेंसिएगा या ब्रँड चा ड्रेस घातलेला आहे आणि ति त्याचबरोबर ब्लॅक ठाय हाय बूट्स सोबत तयार झाली आहे. मालयकाने तिचे केस सोडले आहेत आणि काळ्या रंगाची बॅग हातात घेतली आहे. पण नेटकाऱ्यानी तिच्या या ड्रेस बद्दल टिपण्णी केली आहे की “ज्या ब्रॅण्डवरून एवढा मोठा वाद रंगला तरी देखील मालयकाने त्याचाच ड्रेस घातला, थोडी तरी लाज बाळग. तर एकाने टिपण्णी केली आहे की , ‘मलायका हा ब्रँड घालण्यासाठी योग्य वेळ नाही. तर अजून एकाने टिपण्णी केली आहे की ‘बॅलेंसिएगा घातला आहे??? खरंच?? मी रद्द संस्कृतीच्या पूर्णपणे विरोधात आहे पण बालकांच्या शोषणाच्या बाबतीतच नाही तर . हा ब्रँड सेलिब्रिटीसाठी रद्द करणे आवश्यक आहे, आपण प्रथम ते करणे आवश्यक आहे’अशा प्रकारे सर्व नेटकरे मलाईकाने घातलेल्या ड्रेसच्या ब्रॅण्डचा विरोध करत आहेत.

हे ही वाचा : 

विवेक अग्निहोत्रीला दिल्ली हायकोर्टाची माफी मागावी लागली, जाणून घ्या कारण

पूजा हेगडेच्या ताटातून केक खाण्याचा प्रयत्न केला, रोहित शेट्टी म्हणाला- हा विचित्र प्राणी

शरद पवारांचं कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अल्टीमेटम

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss