spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

OTT Platform वर येणार आहेत ‘या’ नवीन क्राईम थ्रिलर वेब सीरीज…

काही वेब सीरिजना लोकांनाही तुफान प्रतिसाद दिला. वेब सीरिजची पुढील सिझनची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून आली. हे नवीन सिझन नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि जिओ सिनेमावर झळकणार आहेत.

सध्या अनेक वेब सीरिज ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. काही वेब सीरिजना लोकांनाही तुफान प्रतिसाद दिला. वेब सीरिजची पुढील सिझनची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून आली. हे नवीन सिझन नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि जिओ सिनेमावर झळकणार आहेत. तशीच उत्सुकता ‘मिर्झापूर’ (Mirzapur) या क्राईम थ्रिलर वेब सीरिजनेही निर्माण केली आहे. या वेब सीरिजचे तीन सिझन झाले आहेत. आता चौथ्या सिझनची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे. येणाऱ्या पुढील दिवसात काही वेब सीरिजचे पुढील सिझन येणार आहेत. ‘मिर्झापूर’चा आता चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओने स्वतः याची पुष्टी केली आहे, परंतु त्याच्या रिलीजच्या तारखेबद्दल अजून माहिती दिलेली नाही. हा चौथा सीझन २०२५ किंवा २०२६ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

बॉबी देओलची ‘आश्रम’ (Aashram) वेब सीरिजला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. आता पुढील सीझन रिलीज होण्याची लोकांना प्रतीक्षा आहे. ‘आश्रम’ च्या तिन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता चौथ्या सीझनची उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या तरी निर्मात्यांनी या वेब सीरिजच्या रिलीज डेटबद्दल काहीच भाष्य केलेले नाही. परंतु बाबा निरालाच्या नवीन कथेसह लवकरच चौथा सीझन येणार आहे. ‘आश्रम ४’ यावर्षी एमएक्स प्लेयरवर रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘दिल्ली क्राइम’ (Delhi Crime) या वेब सीरिजच्या दोन यशस्वी सीझननंतर आता त्याचा तिसरा सीझन लवकरच येणार असल्याची बातमी समोर आली आहे. नेटफ्लिक्सवरील शेफाली शाहच्या या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाचा तपास दाखवण्यात आला. या सीझनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला तर दुसऱ्या सीझनला सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रतिसाद मिळाला. तसेच ‘कोहरा २’ (Kohrra 2) या नेटफ्लिक्सच्या वेब सीरिजचा दुसरा सीझन येणार आहे. बरूण सोबती त्याच्याच भूमिकेत दिसणार असून त्यात मोना सिंगही दिसणार आहे. अद्याप या वेब सीरिजची रिलीज डेट समोर आलेली नाही.

Latest Posts

Don't Miss