बाळूमामानंतर सुमीत पुसाळकर झळकणार ‘घरोघरी मातीच्या चुली’या नव्या कोऱ्या मालिकेत

छोट्या पडद्यावर सध्या नवनव्या मालिकांची पर्वणी पाहायला मिळत आहेत.अशातच आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बाळूमामानंतर सुमीत पुसाळकर झळकणार ‘घरोघरी मातीच्या चुली’या नव्या कोऱ्या मालिकेत

छोट्या पडद्यावर सध्या नवनव्या मालिकांची पर्वणी पाहायला मिळत आहेत.अशातच आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही नवी कोरी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे ही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर तिच्यासोबत बाळूमामा फेम अभिनेता सुमीत पुसावळे हा देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपासून सुमीत बाळूमामा ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. पण आता सुमीत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच वाहिनीकडून या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय.

सुमीत पुसावळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ऋषीकेश ही भूमिका साकारणार आहे. कुटुंबावर आधारित असणारी ही मालिका 17 मार्चपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सुमीत हा मोठ्या मुलाची तसेच रेश्माच्या नवऱ्याची भूमिका साकारताना पाहायला मिळेल. त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुमीतने बाळूमामा ही मालिका सोडल्याचं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगतलं होतं. यावेळी सुमीतने बाळूमामा मालिकेच्या सेटवरचा एक फोटो शेअर भावनिक कॅप्शन लिहिलं होतं. तसेच या कॅप्शनमध्ये त्याने लवकरच भेटू म्हटलं होतं. त्यामुळे सुमीत आता कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला याची उत्सुकता होती. पण स्टार प्रवाह वाहिनीकडून या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय.ज्यामध्ये सुमीत हा मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत तगडी स्टारकास्ट असणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदेची मुख्य भूमिका आहे. तर, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने व बालकलाकार आरोही सांबरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचे मालिकेच्या प्रोमोतून समोर आले. आशुतोष पत्की या मालिकेत हृषिकेशच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत आहे. तर याआधी विविध मालिकांमधून खलनायिका म्हणून समोर आलेली प्रतीक्षा या मालिकेतही खलनायिका साकारत आहे.

दरम्यान आता प्रेक्षक ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं आता महत्तवाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे का? संजय राऊतांचा सवाल

IPL सुरु होण्यापूर्वीच Chennai Super Kings ला मोठा धक्का

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version