सप्तसूर म्युझिकतर्फे खास गणेशोत्सवानिमित्त नवा म्युझिक व्हिडिओ लाँच, यंदाच्या गणेशोत्सवात वाजणार ‘बोल बाप्पा बोल’

दरवर्षी गणेशोत्सवात (Ganeshotsav) येणारी नवनवी गाणी गणेशभक्तांना आनंद देतात. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात सप्तसूर म्युझिकची (Saptasur Music) निर्मिती असलेलं 'बोल बाप्पा बोल' (Bol Bappa Bol) हे गाणं वाजणार आहे.

सप्तसूर म्युझिकतर्फे खास गणेशोत्सवानिमित्त नवा म्युझिक व्हिडिओ लाँच, यंदाच्या गणेशोत्सवात वाजणार ‘बोल बाप्पा बोल’

Ganeshotsav 2024 : दरवर्षी गणेशोत्सवात (Ganeshotsav) येणारी नवनवी गाणी गणेशभक्तांना आनंद देतात. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात सप्तसूर म्युझिकची (Saptasur Music) निर्मिती असलेलं ‘बोल बाप्पा बोल’ (Bol Bappa Bol) हे गाणं वाजणार आहे. ‘बोल बाप्पा बोल’चा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लाँच (‘Bol Bappa Bol’ music video launched on Saptasur Music’s YouTube channel) करण्यात आला आहे.

सप्तसूर म्युझिकचे साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष (Sainath Rajadhyaksha, Bina Rajadhyaksha) यांनी बोल बाप्पा बोल या म्यूझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विजय जोशी (Vijay Joshi) यांनी लिहिलेलं गाणं अमेय मुळे (Amey Mule) यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर स्वरा जोशी (Swra Joshi) यांनी हे गाणं गायलं आहे. ईशिता देशपांडे, मृणाल जवंजाळ, स्वरा पाटील (Ishita Deshpande, Mrinal Javanjal, Swara Patil) यांचा कोरस आहे. ‘हळूच येऊन बसतोस तू तोऱ्यात पाटावर, लक्ष तुझं असतं सारं गोड मोदकावर’ असे गोड शब्द असलेल्या या गाण्यात गणपती बाप्पाचं आणि उत्सवाचं वर्णन करण्यात आलं आहे.

अॅनिमेशनचा वापर करून करण्यात आलेला हा म्युझिक व्हिडिओ लहान-थोर सर्वांना आवडण्यासारखा आहे. साधे सोपे शब्द, ताल धरायला लावणारं संगीत, उत्तम आवाजातलं हे गाणं गणेशोत्सवात सर्वांच्याच पसंतीला उतरणारं आहे. त्यामुळेच म्युझिक व्हिडिओ लाँच झाल्यापासूनच त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. म्हणूनच उत्सव घरचा असो की मंडळाचा सर्वजण ‘बोल बाप्पा बोल’ म्हणणार आहेत.

हे ही वाचा:

धक्कादायक! सख्ख्या बहिणींनीच दिली वनराज आंदेकरची सुपारी; ‘तुला पोर बोलवून ठोकणार’ म्हणत दिली होती धमकी

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोरदार तडाखा; शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version