Wednesday, July 3, 2024

Latest Posts

Gharat Ganapati चित्रपटात निकिताचा मराठमोळा अंदाज

‘घरत गणपती’ हा आगामी भारतीय मराठी भाषेतील कौटुंबिक नाटक चित्रपट आहे जो नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी सह लिखित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात निकिता दत्ता, भूषण प्रधान, अजिंक्य देव, अश्विनी भावे यांच्यासह संजय मोने, शुभांगी लाटकर आणि शुभांगी गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कोकणात सेट केलेला हा चित्रपट घरत कुटुंबाची गौरी गणपतीच्या स्वागताची वार्षिक परंपरा दर्शवतो, ही प्रथा तीन पिढ्यांपर्यंत कशी आहे आणि पिढ्यानपिढ्या भेदांवर नेव्हीगेट करून आणि त्यांचे बंध दृढ करून कुटुंबाला जवळ आणते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली निकिता दत्ता आगामी ‘घरत गणपती’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. निकिताचा या चित्रपटात मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘जरतारी काठ, नऊवारी थाट, मोगर गजरा साज केसात’, ‘नजरेचा नखरा, नथीचा तोरा, डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा..’अशी शब्दकळा जिच्या बाबतीत म्हटली गेलीय ती अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात खूपच खुलून दिसतेय. त्यासाठी निमित्त आहे तिचा आगामी मराठी चित्रपट.. ‘घरत गणपती’.

जरतारी काठाची जांभळया रंगाची पैठणी, केसांचा सैलसर अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक दागिने असा साजशृंगार करून निकिताने आपला मराठमोळा ठसका ऐटीत दाखविला आहे. ‘घरत गणपती’ हा माझा पहिलाच मराठी चित्रपट. पण या निमित्ताने मराठी चित्रपटाशी, कलाकारांशी आणि इथल्या मराठमोळ्या संस्कृतीशी ओळख झाली. इथले सण-समारंभ, रिती-रिवाज, पोशाख-पेहराव या सगळ्यांनीच मला अक्षरशः भुरळ घातली, असं निकिता सांगते.

पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करीत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने मराठी चित्रपट ‘घरत गणपती’. २६ जुलैला हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हे ही वाचा: 

Pravin Tarde दिग्दर्शित Dharmaveer-2…आता जगभरात पोहोचणार

सतत खोकला येतोय, काही केल्या जात नाही ? करून पहा ‘हे’ उपाय ..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss