spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“प्यार हुआ इकरार हुआ…” गाण्यांवर थिरकले नीता-मुकेश अंबानी, तर राधिकासोबत अनंतनेही केला धमाकेदार परफॉर्मन्स

देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे.

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Party : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांची प्री-वेडिंग फंक्शन्स जोरात सुरू आहेत. हे फंक्शन्स गुजरातमधील जामनगरमध्ये १ मार्चपासून सुरू झाले आहेत. या तीन दिवसीय सोहळ्यात जामनगरमध्ये देश-विदेशातील बड्या व्यक्तींसह बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्सची जणू जत्राच भरली असल्याचे चित्र दिसत आहे.

या प्री-वेडिंग सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी याचा डान्स परफॉर्मन्स हा पहायला मिळाला आहे. या सोहळ्यात दोघांनीही स्टेजवर धमाकेदार डान्स परफॉर्मन्स दिला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, राज कपूरच्या ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या आयकॉनिक गाण्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी शानदार डान्स केल्याचे दिसून येते. मुकेश अंबानी कुर्ता-पायजमामध्ये डान्स करताना दिसले, तर नीता अंबानी सोनेरी रंगाच्या साडीत नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होत्या. अनंतने त्याची होणारी बायको राधिकासोबत एक शानदार नृत्यही केले. यावेळी दोघांची खास केमिस्ट्रीही पाहायला मिळाली. अनंत आणि राधिका त्यांच्या अभिनयाने प्रभावित झाले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग बॅशचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्री-वेडिंग सेरेमनीच्या दुसऱ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मोठा मुलगा आकाश अंबानी, सून श्लोका मेहता आणि मुलगी ईशा अंबानी यांचे लूकही चर्चेत होते.

हे ही वाचा:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे CM Eknath Shinde यांनी घेतले दर्शन

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss