‘टिश्यू नो इश्यू म्हणत अभिनेत्री अमृता सुभाष गमतीशीर व्हिडिओ होतोय व्हायरल

अमृता सुभाषने नवऱ्यासोबत इंस्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे. जे पाहून अनेकांना आपलं हसू आवरता आलेलं नाही. 

‘टिश्यू नो इश्यू म्हणत अभिनेत्री अमृता सुभाष गमतीशीर व्हिडिओ होतोय व्हायरल
मराठी सिनेसृष्टीतील आपल्या उत्तम आभिनयाची छाप सोडलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री अमृता सुभाष. अमृताने आत्ता पर्यंत नाटक, सिनेमा, मालिका आणि वेब विश्वात उत्तम कामगिरी निभावली. तिने साकारलेली अनेक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. पण अमृता सुभाष सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. ते म्हणजे तिने नुकतच तिच्या नवऱ्यासोबत इंस्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे. जे पाहून अनेकांना आपलं हसू आवरता आलेलं नाही.  (Amruta Subhash video becoming viral)
या व्हिडिओ मध्ये अमृता अचानक किचन मधून हातात टिश्यू रोल घेऊन बाहेर येते. आणि जोरात ओरडुन तिच्या नवऱ्याला म्हणजेच अभिनेता संदेश कुलकर्णीला हा टिश्यू रोल खूप मोठा आहे असे सांगते. आपण चुकून हा खरेदी केला असही म्हणते. तेव्हा संदेश तिला त्यात काय आपण पुन्हा परत करू असं म्हणतो. तेव्हा ती असं कसं परत करणार कुणी घेणारच नाही. तेव्हा तो आपण हा टिश्यू रोल तिथेच सोडून येऊ असं म्हणतो. तेव्हा अमृता अशा प्रकारे फसवणूक करण्यावरून त्याला ओरडते तेव्हा तो गोंधळून नाही नाही आपण असं नको करूया म्हणून ते टाळतो. काहीच सेकंदात संदेश मोठया कटर च्या सहाय्याने तो टिश्यू रोल अर्धा करतो आणि म्हणतो आता हा वापर. तो टिश्यू रोल घेऊन अमृता टॉयलेट मध्ये जाते. शेवटी संदेश इतका मोठा टिश्यू रोल कुणाला लागत असेल असे गमतीने म्हणतो. व्हिडिओ चा शेवट पाहून अनेकांना आपलं हसू आवरता आलेलं नाही. त्यात अमृता आणि संदेश चा अभिनय पाहून अनेकांनी हे रील पुन्हा पुन्हा पाहिल्याच कमेंट मध्ये म्हटलं आहे.
https://www.instagram.com/reel/Cfsfo_Fq-xl/?igshid=YmMyMTA2M2Y=
अमृता आणि संदेश च हे मजेशीर रील चाहत्यांनी तुफान शेअर केलं आहे. या रील ची गोष्ट अमृता आणि संदेशच्या नाटकावर आधारित असून नाटकाचं नाव पुनश्च हनिमून असं आहे. नवरा बायकोच्या नात्यातील अनेक पदर उलगडणार हे नाटक आहे. अमृताने ‘टिश्यू नो इश्यू! #पुनश्चहनिमून, १० जुलै ५.३० वा भरत नाट्य मंदिर, पुणे. BMS वर बुकिंग चालू’, असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. यात अमृताने ‘पुनःश्च हनिमून’ असा उच्चार केला आहे.
Exit mobile version