स्वतःची साडी सांभाळणं इतकं ही कठीण नाही; नोरा फतेही झाली ट्रोल

नोराने सध्या चाहत्यांचा रोष ओढावून घेतलाय आणि यासाठी कारण ठरतोय तो म्हणजे मुंबईचा पाऊस.

स्वतःची साडी सांभाळणं इतकं ही कठीण नाही; नोरा फतेही झाली ट्रोल
अभिनेत्री नोराह फतेहीचे अनेक चाहते आहेत. नोरा फतेही (Nora Fatehi) स्टायलिंग, तिच्या दिलखेचक अदांमुळे आणि कमाल डान्समुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. नोरा सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असते. ती तिचे नवनवीन कपड्यांमधील फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडतात.
मात्र नोराने सध्या चाहत्यांचा रोष ओढावून घेतलाय आणि यासाठी कारण ठरतोय तो म्हणजे मुंबईचा पाऊस.
मुंबईतील पाऊस म्हटलं की रस्त्यावरून चालताना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. नेमकं नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) बाबतीत असच झालं. नोरा जेव्हा ‘डान्स दिवानेच्या’ सेटवर पोहचली तेव्हा नेमकं पाऊस पडायला सुरूवात. तेव्हा नोराने फिक्या गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. पावसामुळे गाडीतून उतरताना तिला साडी सांभाळता येत नव्हती. यासाठी तिने तिच्या बॉडीगार्डची मदत घेतली. नोराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CflpByVF6iq/?igshid=YmMyMTA2M2Y=
एका नेटकऱ्याने स्वतःची साडी सांभाळता येत नाही का? (Nora Fatehi Trolled) स्वतःचे कपडे आणि सांभाळायचे दुसऱ्यांनी? तर एकाने पावसात साडी सांभाळणं इतकं ही कठीण नाही. अशा प्रकाच्या अनेक टीका नेटकऱ्यानी व्हिडिओ खाली केल्या आहेत. हा व्हिडिओ मानव मंगलानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमुळे अनेकांनी नोरा ला ट्रोल केले आहे.
Exit mobile version