FIFA World Cup 2022 च्या समारोप समारंभात नोरा फतेही चमकली, दमदार परफॉर्मन्सने केले चाहत्यांना थक्क

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नोरा फतेही फिफा विश्वचषक २०२२ च्या समारोप समारंभाच्या मंचावर आपल्या नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत आहे.

FIFA World Cup 2022 च्या समारोप समारंभात नोरा फतेही चमकली, दमदार परफॉर्मन्सने केले चाहत्यांना थक्क

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या दमदार डान्ससाठी प्रसिद्ध आहे. नोरा फतेहीने रविवारी फिफा विश्वचषक फायनल २०२२ च्या (FIFA World Cup 2022) समारोप समारंभात नेत्रदीपक नृत्य सादर केले. नोरा फतेहीच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘लाइट द स्काय’ (Light the Sky) गाण्यावरील नोराचा हा डान्स परफॉर्मन्स सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

कतारमधील लुसेल स्टेडियमवर FIFA विश्वचषक २०२२ मध्ये अर्जेंटिना (Argentina) आणि फ्रान्स (France) यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान बी-टाऊनची प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिच्या नृत्याविष्काराने चांगलीच रंगत आणली आहे. यादरम्यान नोराचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नोरा फतेही ‘लाइट द स्काय’ (Light the Sky) गाण्यावर अप्रतिम गायन आणि नृत्य करताना दिसत आहे, काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नोरा फतेही फिफा विश्वचषक २०२२ च्या समारोप समारंभाच्या मंचावर आपल्या नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत आहे.

नोरा फतेही व्यतिरिक्त, एमिराती पॉप स्टार बल्किस, इराकी संगीतकार रेहमा रियाद आणि मोरोक्कन गायक मलान यांनी FIFA विश्वचषक २०२२ च्या अंतिम रात्री ‘लाइट द स्काय’ (Light the Sky) गाण्याद्वारे स्पर्धेचा समारोप सोहळा आणखी स्फोटक बनवला. नोरा फतेहीने या सेलिब्रिटींसोबत स्टेज शेअर करून बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे.

हे ही वाचा:

FIFA World Cup 2022 अर्जेंटिनाच्या दमदार कामगिरीच्या मागे ‘हे’ पेय आहे का? मेस्सीचा फोटो होतोय व्हायरल

FIFA World Cup ट्रॉफीचे अनावरण करत दीपिका पादुकोणने रचला इतिहास, मात्र या कारणामुळे अभिनेत्री झाली पुन्हा ट्रोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version