spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महेश मांजरेकर नाही तर ‘हा’ अभिनेता करणार बिग बॉस मराठी ४ चे होस्टिंग

प्रेक्षकांकडून विविध मराठी अभिनेत्यांची नावं या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी सुचवली जात आहेत.

एक वादग्रस्त कार्यक्रम म्हणून प्रेक्षकांमध्ये पसंती मिळवणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. मराठी बिग बॉसचा चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. पण त्यातच प्रेक्षकांना थक्क करणारी अजून एक बातमी म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार नसल्याच्या सर्वत्र रंगत असलेल्या चर्चा. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. त्याचबरोबर गेल्या तिन्ही सीझनसचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते.

बिग बॉस मराठीच्या तीन पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांच्यासोबत तीन वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. मात्र गेल्यावर्षी ते कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. त्यामुळे आता बिग बॉसचे चौथे पर्व कोण होस्ट करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. प्रेक्षकांकडून विविध मराठी अभिनेत्यांची नावं या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी सुचवली जात आहेत.

या सर्व गोंधळात एका मराठमोळ्या अभिनेत्याचे नाव समोर येत आहे आणि तो अभिनेता म्हणजे सिध्दार्थ जाधव. सिध्दार्थ जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. तो सध्या मराठी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसतो. त्याने मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. पण अद्याप याकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच सिद्धार्थनेही याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे तो नक्की हे पर्व होस्ट करणार की नाही याबद्दल विविध तर्क-विर्तक सुरु झाले आहेत.

त्यामुळे आता सिद्धार्थ जाधव नक्की बिग बॉस ४ चे सूत्रसंचालन करणार का? आणि जरी ही गोष्ट खरी असली तरी सिध्दार्थ जाधवनेबिग बॉस ४ चे केलेले सूत्रसंचालन प्रेक्षकांना आवडेल का? हे पाहणे आता येत्या काळातच कळेल.

Latest Posts

Don't Miss