spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच घरी येते; Kokan hearted girl ची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल

‘कोकण हार्टेड गर्ल’ (KokanHearted Girl) नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली कोकण कन्या अंकिता प्रभू वालावलकर सध्या ‘बिग बॉस मराठी’ ( Big Boss Marathi) च्या पाचव्या सिझनमुळे अधिकच लोकप्रिय झाली आहे. तिच्या सोशल मीडियामुळे ती जितकी चर्चेत असते तितकीच ती आता बिग बॉसच्या घरातील खेळामुळे चर्चेत आहे. अंकिताने बिग बॉसच्या घरातील खेळाच्या युक्तीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकतेच गणेशोत्सवानिमित्त तिने तिच्या सोशल मीडियावर बाबांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने बाबांचा फोटो शेअर करून, “आज मला तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे” असे म्हटले आहे.

काय आहे अंकिताची इंस्टाग्राम पोस्ट?

बाबा,
आतापर्यंत आपल्यात बरेच आंबट गोड खटके उडलेत. कधी तुम्ही चिडलात तर कधी मी रुसले. पण खरं सांगू बाबा कितीही मतभेद असले तरी तुम्ही आमच्यासाठी घेतलेली मेहनत आणि तुमचं प्रेम आम्हाला नेहमी दिसलं. आज ही कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे.

लहानपणी मी ठरवलं होतं की, मुलगी असून मी तुम्हाला कसलीच कमी कधी जाणवू देणार नाही. लहानपणी फटाक्यांसाठी हट्ट करायचो पण तुम्ही महाग म्हणून द्यायचा नाहीत आणि आता नेहमी फटाके घेऊन समुद्रावर येता आणि आम्ही वाजवत देखील नाही. तुमच्या हातातली ती फटाक्यांची पिशवी कायम भरलेलीच असते. नेहमी गणपतीत माझी गडबड असायची कोण पाट उचलणार, विसर्जनच्या वेळी कोणी असेल ना? कारण मुलगी म्हणून इथे मी नेहमी कमी पडले. शाडू मातीची २-३ फुट उंचीची मूर्ती उचलणं मला जमण्यासारखं नाही आणि नव्हत.पण बिग बॉसच्या घरात असताना देखील खूप आधी मी हया सगळ्याची व्यवस्था करून आलेय, तुम्हाला काळजी करावी लागणार नाही, ७ व्या दिवशी माझे मित्र नक्की घरी येतील आणि मूर्ती विसर्जनाला मदत करतील. काळजी करू नका. गेल्यावर्षी बाप्पासोबत रात्री गप्पा मारल्या होत्या मी, जेव्हा सगळे झोपले होते,आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी…

या सोशल मीडिया पोस्टवर अंकिताच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद देऊन लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हे ही वाचा:

Nitesh Rane यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर Ambadas Danve यांचा टोला; गल्लीत डझनभर केळी विकत घेणे आणि देश चालवणे यात फरक…

Rajkot Fort: Chetan Patil चा जामीन अर्ज फेटाळला तर Jaydeep Apte च्या न्यायालयीन कोठडीत वाढ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss