Nyrraa Banerji ला शूटींग दरम्यान दुखापत!

परंतु तरीही नायराने स्टंट पूर्ण केला. या पराक्रमामुळे नायराचे इतर सर्व स्पर्धकांनी भरभरून कौतुक केले.

Nyrraa Banerji ला शूटींग दरम्यान दुखापत!

खतरो के खिलाडी हा कार्यक्रम पूर्वी पासूनच प्रेक्षकांचा खूप आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सीजन ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. यंदाच्या ‘खतरो के खिलाडी १३’ ची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीजनची देखील प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. ‘खतरो के खिलाडी १३’ सीजन चे सध्या दक्षिण आफ्रिकेत शूट चालू आहे. खतरो के खिलाडी हा कार्यक्रम प्रसिद्ध निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) होस्ट करत असून, या कार्यक्रमात अनेक साहसी खेळ खेळले जातात. यातच आता येणाऱ्या सीजनच्या शूटिंग दरम्यान नायरा बॅनर्जी (Nyrraa Banerji) हिला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

खतरो के खिलाडी या कार्यक्रमाच्या येणाऱ्या सीजनची शूटिंग ही दक्षिण आफ्रिके मध्ये सुरू झाली असून. या शूटिंगदरम्यान स्पर्धकांना अनेक अडचणींचा तसेच संकटांचा सामना करावा लागत आहे. खतरो के खिलाडी हा कार्यक्रम बऱ्याच वेळेस चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. या कार्यक्रमाच्या आधीच्या सिजन्स मध्ये अनेक स्पर्धकांना गंभीर दुखापतीला तोंड द्यावे लागले. या आधी रोहित रॉय (Rohit Roy), अरिजित तनेजा (Arijeet Taneja) आणि ऐश्वर्या शर्मा (Aishwariya Sharma) हे स्पर्धक स्टंट करताना झालेल्या दुखापतीमुळे चर्चेत होते.नुकतीच अभिनेत्री नायरा बॅनर्जीलाही स्टंटमुळे गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

नायरा बॅनर्जीला पाण्याशीसंबंधित स्टंट करताना दुखापत झाली आहे.अशी माहिती पिंकव्हिलाने दिली आहे. पाण्याचा हा स्टंट करत असताना नायरा ला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. नायरा ने स्टंट करत असताना पायात लांब मोजे न घातल्याने तिला दुखापत झाली आहे. परंतु तरीही नायराने स्टंट पूर्ण केला. या पराक्रमामुळे नायराचे इतर सर्व स्पर्धकांनी भरभरून कौतुक केले.

‘खतरों के खिलाडी’ चा १३वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिजन मध्ये प्रेक्षकांना डेजी शाह (Daisy Shah), अर्जित तनेजा (Arijeet Taneja), शीझान खान (Shijan Khan), रुही चतुर्वेदी (Roohi Chaturvedi), रोहित बोस रॉय (Rohit Bose Roy), रश्मीत कौर (Rashmit Kaur), अंजुम फकीह (Anjum Fakih), अंजली आनंद (Anjali Anand) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) हे स्पर्धक पाहायला मिळणार आहेत. ‘खतरों के खिलाडी १३’ या कार्यक्रमाच प्रसारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. येणाऱ्या पर्वात शिव ठाकरे आणि अब्दू (Abdu) या प्रसिद्ध मित्रांची जोडी सुद्धा पाहायला मिळणार आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

हे ही वाचा:

सगळं काही भाजपचंच

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन, या जिल्यामध्ये काही तासात होणार पावसाला सुरुवात

कर्नाटक मधील स्त्रियांसाठी खुशखबर, सिद्धरामय्या सरकारने केले वचन पूर्ण!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version