महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने झळकणार आता मोठ्या पडद्यावर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने झळकणार आता मोठ्या पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मनोरंजक कार्यक्रमातून तूफान लोकप्रिय झालेल विनोदी अभिनेता ओंकार भोजने हा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ओंकार हा ‘कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस’, ‘तुमच्यासाठी काही पण’, ‘ एकदम कडक’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला. कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि एकापेक्षा एक विनोदी संवादाने ओंकारने तर समस्त प्रेक्षकांना वेड लावले. आता हाच कॉमेडी किंग लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मिती असलेल्या एका बिग बजेट मराठी चित्रपटात अभिनेता ओंकार भोजने पहिल्यांदाच मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने ओंकार एका वेगळ्या अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर येणार आहे.

हेही वाचा : 

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही मशीद वादा प्रकरणी न्यायालयात ११ याचिका प्रलंबित

नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या आगामी चित्रपटात ओंकार सोबत मराठीतील दिग्गज कलाकार असल्याचेही माहिती समोर आली आहे. ‘आटपाडी नाईट्स’ फेम लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आहे. चित्रपटाचे पहिले शेड्यूल भोर परिसरात मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले. आरती चव्हाण यांची निर्मिती असलेल्या या आगामी बिग बजेट मराठी चित्रपटाचे नाव तसेच ओंकार भोजनेसोबत कोणती नायिका झळकणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

भाजपचा बडा नेता आज शरद पवार यांच्या भेटीला

ओंकारने साकारलेल्या भूमिकेवर आपले मत मांडले,”आजवर टीव्ही किंवा चित्रपटात साकारलेल्या भूमिकांपेक्षा या व्यक्तिरेखेची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. यासोबतच प्रमुख भूमिकेत मी समोर येतोय याचा आनंद आहे. या चित्रपटाचा नायक ज्या वयाचा आणि ज्या भावनिक विश्वात आहे त्याच अवस्थेत मी आहे, हे मला चित्रपटाचे नॅरेशन सुरू झाले तेव्हा जाणवले. हे पात्र दिग्दर्शकाला जसे हवे होते ते साकारण्यासाठी मला संपूर्ण टीमची मदत झाली, एकांकिका करताना जशी एनर्जी असायची तशीच एनर्जी मला या सेटवर जाणवली यामुळे काम करताना खूप गंमत आली.

आज अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि पूजा करण्याची पद्धत

Exit mobile version