सोशल मीडियावर शाहरुख खानला चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर, मुंबई पोलिसांनी दिले ‘हे’ उत्तर

सोशल मीडियावर शाहरुख खानला चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर, मुंबई पोलिसांनी दिले ‘हे’ उत्तर

बॉलीवूड (Bollywood) बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या पठाण (Pathan) या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत राहिला आहे. ‘पठाण’च्या (Pathan) रिलीजला आता एका महिन्याहून कमी कालावधी शिल्लक आहे. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण (Pathan) चित्रपटाबद्दल जर चाहत्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने ‘आस्क मी’ (Ask Me) हे सेशन सुरु केले आहे. यामध्ये शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते थेट शाहरुख खानलाच प्रश्न विचारू शकतात आणि त्यांच्या प्रश्नांचे शाहरुख (Shah Rukh Khan) स्वतः त्यांना उत्तर देतो. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) चाहत्यांच्या मनात ‘पठाण’ चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढत आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खानने (Shah Rukh Khan) चाहत्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुन्हा एकदा ‘आस्क मी’ (Ask Me) सेशन ठेवले होते. या सत्रांबद्दल, शाहरुख खानच्या चाहत्यांसह, अनेक सेलिब्रिटींनी देखील किंग खानला अनेक मजेदार प्रश्न विचारले होते. ज्यावर शाहरुखने (Shah Rukh Khan) देखील खूप मजेदार उत्तर दिले. यावेळेस शाहरुख खानच्या एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला प्रतिउत्तर दिले आहे.

शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) ‘आस्क मी’ (Ask Me) हे सत्र ट्विटरवर आयोजित करण्यात येत. यावेळेस शाहरुख खानचे अनेक चाहते त्यांच्या मनातील प्रश्न हे शाहरुखला विचारताना दिसले. अलीकडेच शाहरुख खान याने ‘आस्क मी’ (Ask Me) हे सेशन आयोजित केले होते. त्यावेळेस एका युजरने शाहरुख खानला असा प्रश्न विचारला कि त्याचे उत्तर थेट मुंबई पोलिसांनीच दिले आहे. तर झाले असे की, आस्क मी सेशन सुरु असताना एका चाहत्याने अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला प्रश्न विचारला की ‘सर एक ओटीपी (OTP) आला असेल… फक्त मला सांगा.’ चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नाला शाहरुखने (Shah Rukh Khan) अगदी मजेशीर उत्तर दिले. ज्यामुळे सर्व जण हसले आणि तो देखील नक्कीच थक्क झाला असेल. शाहरुखने उत्तर देताना लिहिले की, “बेटा, मी खूप प्रसिद्ध आहे, मला OTP ची गरज नाही… मी ऑर्डर करतो तेव्हा विक्रेते फक्त माल पाठवतात… तू तुझ बघ.”

 

बॉलीवूड बादशाह शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) हे उत्तर लोकांना खूप आवडले पण त्यानंतर देशाच्या रक्षणासाठी स्थापन केलेल्या संघटनेनेही या युजरने विचारलेल्या प्रश्नावर प्रतिउत्तर दिले आहे.शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) कमेंटखाली मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) उत्तर देताना ‘१००’ असे लिहिले आहे , मुंबई पोलिसांचा आपत्कालीन क्रमांक १०० आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्या युजरला चेतावणी दिली आहे.

हे ही वाचा:

“तेव्हापासून तर मी दिल्लीच्या संसदेत जायला घाबरतो” शरद पवारांनी मोदींना अप्रत्यक्षपणे लगावला टोला

दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आता मुलुंडला येणार? हालचालींना वेग

Makar Sankranti 2023 , मकर संक्रांतीला लहान मुलांचं बोरन्हाण का करतात ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version