चाहत्यांनी दिलेल्या कमेंटवर गश्मीर महाजनी म्हणाला…

रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) याला नेटकाऱ्यानी मोठ्या प्रमाणावर ट्रोल करायला सुरुवात केली.

चाहत्यांनी दिलेल्या कमेंटवर गश्मीर महाजनी म्हणाला…

रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) याला नेटकाऱ्यानी मोठ्या प्रमाणावर ट्रोल करायला सुरुवात केली. तो नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यावेळी एका चाहत्याने त्याला छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याशी त्याची तुलना केली आहे. या आधी देखील गश्मीर याने प्रवीण तरडे यांच्या हंबीरराव मोहिते या चित्रपटात ऐतिहासिक भूमिकेत काम केले आहे.

‘Ask Gash’ या सेशनच्या माध्यमातून गश्मीरच्या एका चाहत्याने गश्मीरची थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली आहे. या सर्व प्रकरणात गश्मीरने दिले उत्तर सध्या खूप चर्चेत आहे. गश्मीरच्या चाहत्याने कमेंट केली आहे की,”सर, तुमच्या आयुष्यातील संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आहे”. यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला,”खूप मोठी तुलना करत आहात…माझ्यात त्यांच्या नखाचीही सर नाही”.गश्मीरला एका चाहत्याने प्रश्न विचारला तुमच्या नावाचा अर्थ काय तेव्हा त्याने उत्तर दिले “हनुमानाचं नाव आहे” तुम्ही तुमच्या घरी बाप्पाची स्थापना करता का? यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला,”हो करतो..खूपच साधं, मंगलमय आणि घरगुती वातावरण असतं आमच्याकडे”. ‘धर्मवीर’ सिनेमाबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला,”धर्मवीर’ सिनेमाबद्दल दोन शब्दात बोलणं कठीण आहे. माझ्या मोठ्या भावाचा सिनेमा आहे आणि चांगला सिनेमा आहे”.

गश्मीर हा त्याच्या आईला अम्मी अशी हाक मारतो. त्यावर एकाने प्रश्न विचारला “तुम्ही तुमच्या आईला अम्मी का म्हणता? यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला,”माझे वडील त्यांच्या आईला अम्मी अशी हाक मारत असे. खूप लहान असताना हा शब्द ऐकला असून तेव्हापासून हे नाव तोंडात बसले आहे”. गश्मीर हा त्याच्या सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतो. त्याचा पोस्ट सध्या नेहमीच चर्चेत असतात. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने त्याच्या कामातून ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा एकदा तो काम करण्यासाठी सज्ज आहे.

Exit mobile version