spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गणेशोत्सवाचं औचित्य साधत, कोकणातील नयनरम्य सौंदर्य दाखवणारं ‘देवाक काळजी २’ या वेबसिरीजमधील ‘गाव कोकण’ गाणं; सोशल मीडियावर होतंय तुफान व्हायरल!

अभिनेता समीर खांडेकर दिग्दर्शित ‘देवाक काळजी १’ या वेबसिरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचं औचित्य साधत ‘देवाक काळजी २’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

अभिनेता समीर खांडेकर दिग्दर्शित ‘देवाक काळजी १’ या वेबसिरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचं औचित्य साधत ‘देवाक काळजी २’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनुश्री फिल्म्सचे निर्माते मयूर तातुसकर आणि आपली सोसल वाहिनी निर्मित ‘देवाक काळजी २’ या वेबसिरीजमधील ‘गाव कोकण’ हे गाणं अनुश्री फिल्म्सवर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर, केतकी पालव, पूजा खानोलकर हे कलाकार आहेत, तर हे गाणं राजेश्वरी पवार हिच्या सुमधूर आवाजात आहे. रविराज काळे यांनी या गाण्याचं संगीत केलं असून गीतकार मंदार इंगळे आहेत.

या गाण्याविषयी दिग्दर्शक – अभिनेता समीर खांडेकर सांगतात, “अनुश्री फिल्म्स आणि ‘आपली सोसल वाहिनी’ विषयी सांगायचं झालं, तर या दोन्ही प्रोडक्शन हाऊसनी एकत्र येऊन खूपच दर्जेदार कामगिरी केली आहे. मी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. आमचा उद्देश स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांची कला प्रेक्षकांसमोर आणणं आहे.” निर्माते मयूर तातुसकर या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “’गाव कोकण’ या गाण्याचं चित्रीकरण अत्यंत खास आणि अविस्मरणीय होतं. कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य आणि तिथलं लोकजीवनाचं जिवंत चित्रण करण्यासाठी आम्ही विशेष मेहनत घेतली. चित्रीकरणासाठी नैसर्गिक आणि सुंदर ठिकाणं निवडली होती, ज्यामुळे कोकणाचं अप्रतिम सौंदर्य गाण्यात सजीव झालं. आपली सोसल वाहिनीच्या ‘देवाक काळजी सीझन १’ या सिरीजला मिळालेल्या प्रेरणेतून आम्ही सीझन २ मध्ये सहभागी झालो. स्थानिक लोकांनी या कलाकृतीत खूप सहकार्य केलं, ज्यांचे मनःपूर्वक आभार मानावेसे वाटतात. त्यांच्यामुळे या गाण्यातील प्रत्येक दृश्य अधिक प्रभावीपणे चित्रित करता आलं.”

पुढे ते सांगतात, “अनुश्री फिल्म्सने अजय गोगावले- पंढरीचे आई, दिव्य कुमार -भाव भक्ती विठोबा, आर्या आंबेकर-देवा गणेशा, रोहित राऊत-तु सखा श्रीहरी, मनीष राजगिरे-गजानना, पदमनाभ गायकवाड-रायगड जेजुरी, अवधूत गांधी-लढला मावळा रं, आणि राजेश्वरी पवार-गाव कोकण, भेटीची रं देवा या सारख्या गायकांसोबत विविध प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत. चांडाळ चौकडीच्या करामतींमध्ये नक्षत्रा मेढेकर, रोहित चव्हाण या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत, ज्या प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडणाऱ्या आहेत. आमचा उद्देश स्थानिक संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवणं आहे. सध्या आम्ही सिंहगड किल्ल्याच्या इतिहासावर आधारित एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटरी तयार करत आहोत. आमचा प्रेक्षकांपर्यंत उत्कृष्ट कलाकृती पोहोचवण्याचा ध्यास असाच पुढे चालू राहील. “

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Aaditya Thackeray तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलात, तुम्हाला शेती माहित नाही: Dhananjay Munde

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss