spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवरात्रीनिमित्त ‘विठ्ठला तूच’ चित्रपटातील एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

सध्या रोमॅंटिक गाण्यांची चलती असताना यांत भर घालत 'विठ्ठला तूच' चित्रपटातील 'सखे तुझं लाजणं' हे रोमँटिक सॉंग रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

सध्या रोमॅंटिक गाण्यांची चलती असताना यांत भर घालत ‘विठ्ठला तूच’ चित्रपटातील ‘सखे तुझं लाजणं’ हे रोमँटिक सॉंग रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नवरात्रीचे औचित्य साधत हे रोमँटिक गाणे या नवरात्रीत थिरकायला लावण्यास सज्ज झाले आहे. नवरात्री करिता ठेका धरायला लावणारे बिट्स या ‘सखे तुझं लाजणं’ या गाण्यास देण्यात आले आहेत, यंदा नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत हे गाणे प्रेक्षकांना ठेका धरायला लावणार यांत वादच नाही. ‘वाय.जे. प्रॉडक्शन’ निर्मित आणि दिग्दर्शक प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित ‘विठ्ठला तूच’ या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणं अगदी रोमँटिक, प्रेमळ असं आहे ज्यात प्रेमाच्या भावना आहेत, सुंदर असा डान्स आहे आणि जोडीला बॉलिवूडचा फिल देणारे व्हाईब्स आहेत. या गाण्याचे आणखी विशेष कारण असं की या गाण्यात नवोदित आणि चित्रपटाचा मुख्य नायक योगेश जम्मा आणि अभिनेत्री उषा बिबे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

या चित्रपटातील ‘विठ्ठला तूच तूच तू’ हे भक्तिमय गीत जसे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले तसे चित्रपटातील ‘सखे तुझं लाजणं’ हे गाणंही प्रेमी बांधव डोक्यावर उचलून धरतील यांत वादच नाही. या गाण्याला मोस्ट पॉप्युलर, जिचा आवाज सतत कानावर पडत राहावा असं वाटतं, जिचे सूर थेट मनाला भिडतात अशी गायिका वैशाली माडे आणि सुप्रसिद्ध गायक जावेद अली यांनी सुरबद्ध केले आहे. तर ‘सखे तुझं लाजणं’ या गाण्याला संगीत संगीतकार हर्षित अभिराज यांनी दिले असून या गाण्याच्या कोरियोग्राफीची जबाबदारी योगेश जम्मा यांनी सांभाळली आहे. तर या गाण्याचे बोल विनायक पवार यांनी शब्दबद्ध केले आहेत. ‘विठ्ठला तूच’ चित्रपटाची कथा ही रोमँटिक आहे, आणि चित्रपटातील ‘सखे तुझं लाजणं’ हे रोमँटिक सॉंग प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करायलाही सज्ज झाले आहे.

प्रेमी युगुलांच्या दिलावर राज्य करण्यासाठी आणि नवरात्रोत्सवात थिरकायला भाग पाडणारे ‘विठ्ठला तूच’ चित्रपटातील ‘सखे तुझं लाजणं’ हे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच येईल, यांत शंकाच नाही.

हे ही वाचा:

देशात पहिल्यांदाच धावणार अंडरग्राउंड बुलेट ट्रेन

WhatsApp आणि OTT प्लॅटफॉर्म कायद्याच्या कक्षेत,जाणून घ्या दूरसंचार विधेयकाशी संबंधित महत्वाचे मुद्दे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss