एक स्टार दुसरे स्टार को ही समर्थन करेंगे;आलिया सिद्दीकीचा सलमान खानवर निशाणा

आलियाने बिग बॉसओटीटी २ मध्ये आठवी स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता . ती म्हणाली की ती तिची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी शोमध्ये आली होती कारण तिची एकमेव सार्वजनिक ओळख ही स्टार पत्नी आहे.

एक स्टार दुसरे स्टार को ही समर्थन करेंगे;आलिया सिद्दीकीचा सलमान खानवर निशाणा

बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची एक्स पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.आलिया सिद्दीकीने नवाजुद्दीन सिद्दीकीवर गंभीर आरोप केले होते ,ज्याचा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी यांच्यातिल वाद इतका वाढला कि तो थेट कोर्टापर्यंत जाऊन पोहचला.आलिया सिद्दीकीही आता नुकताच सुरु झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी च्या सीजन २ (bigg boss ott 2 )मध्ये गेली आहे. या शो मध्ये ती एक प्रतिस्पर्धी म्हणून गेली आहे.

आलियाने बिग बॉसओटीटी २ मध्ये आठवी स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता . ती म्हणाली की ती तिची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी शोमध्ये आली होती कारण तिची एकमेव सार्वजनिक ओळख ही स्टार पत्नी आहे. तिने नवाजुद्दीनसोबतच्या कायदेशीर भांडणाची बातमी केली होती.आलिया सिद्दीकी ही बिग बाॅस ओटीटी २ मधून आता बाहेर पडली आहे. आलिया सिद्दीकी ही मिड विक इविक्शनमध्ये (Mid week eviction)बाहेर पडली आहे.

बिग बॉस ओटीटी २ (bigg boss ott 2 )मधील तिच्या प्रवासाबद्दल सांगताना, आलिया सिद्दीकीने DNA इंडियाला सांगितले, “मैंने अपने बारे में बात कर ली, पर उस बात को ले के मुझे टार्गेट करना, ये मुझे समज नहीं आया (होय, मी घरातील माझा भूतकाळ शेअर केला आहे. , पण, त्यासाठी मला का टार्गेट करण्यात आले हे मला समजले नाही). प्रत्येकजण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करत होता. मलाच का टार्गेट करण्यात आले?” शोमध्ये सलमान खान पक्षपाती होता का असे विचारले असता आलियाने होकार दिला. १००%. सलमान उन्हीका साथ देंगे जो उनके आसपास है. एक स्टार, दसरे स्टार को ही समर्थन करेंगे (सलमान त्याच्या जवळच्या व्यक्तीला पाठिंबा देईल. एक स्टार दुसऱ्या स्टारला सपोर्ट करेल).”

“अब नेक्स्ट वीकेंड (next weekend) पे मैं देखना पसंद करूंगी की ,जो पूजा (भट्ट) ने कहा की ‘मैं महेश भट्ट की बेटी हूं’ (पूजा बढाई मारते की ‘ती महेश भट्टची मुलगी आहे), मला बघायचे आहे की सलमान यावर काय प्रतिक्रिया देईल. मी बाहेरच्या जगाबद्दल बोलले आहे आणि तीदेखील बोलली आहे. त्यामुळे खेळ किती न्याय्य आहे हे मला पहायचे आहे,” आलिया पुढे म्हणाली. ‘जनता का बिग बॉस’ असा दावा केल्याप्रमाणे या सीझनमध्ये जनता खरोखरच सत्तेत आहे आहे का याबद्दल तिने थोडक्यात भाष्य (Commentary)केले. तिने म्हणाली, “मुझे नहीं लगता की ये जनता का बिग बॉस है (मला नाही वाटत हे लोकांचे मत आहे).” इंडस्ट्रीत पक्षपातीपणा आहे, असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

Kohli आणि Dhoni च्या संदर्भामध्ये Virender Sehwag ने केले मोठे विधान

K. Chandrashekar Rao यांच्या Bharat Rashtra Samithi ने शड्डू ठोकले; NCP च्या पोटात गोळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version