‘हर हर महादेव’ चित्रपटाला सोलापुरात विरोध?

‘हर हर महादेव’ चित्रपटाला सोलापुरात विरोध?

शरद केळकर हर हर महादेव हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रकाशित झाला. त्यामागोमाग आगामी मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाचे प्रदर्शित लवकरच होणार असलयाचे एका कार्यक्रमामध्ये सांगण्यात आले . या कार्यक्रमामध्ये वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे हे उघड झाल होत. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अक्षय कुमार सह सर्व कलाकारांचा सत्कार केला गेला . पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी काल पत्रकार परिषद घेऊन “ऐतिहासिक चित्रपटामध्ये इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात आहे. असा आक्षेप करत या दोन्ही चित्रपटांना विरोध केला आहे .

‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये चुकीच्या गोष्टी दाखवून इतिहासाचा विपर्यास केला असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तसेच महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटसाठी घेतलेले कलाकार भूमिकेला शोभत नाहीत, चुकीचा इतिहास दाखवलात तर चित्रपट बंद पाडू, असे संभाजीराजे यांनी सांगितले.संभाजीराजे छत्रपती यांच्या या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने पाठिंबा दर्शवला आहे .

संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत सोलापुरात सुरु असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो सकल मराठा समाजाने बंद पडला आहे. सोलापुरातील ‘इ स्क्वेअर मल्टिप्लेक्स’मध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो सुरू होता. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांची माफी मागून चित्रपटाचा सुरू असलेला शो थांबवला. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या १९ प्रेक्षकांच्या तिकिटाचे ही पैसे त्यांनी परत करायला लावले. छत्रपती संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर सोलापुरात तीव्र पडसाद उमटले आहेत. थिएटर व्यवस्थापकाला निवेदन देऊन यापुढे असे चित्रपट न दाखवण्याची विनंती सुद्धा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.तर संभाजीराजांच्या या भूमिकेला सोलापूरातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले आहे.

Exit mobile version