spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Oscar Awards 2023 RRRच्या नाटु नाटु गाण्याला मिळाले नामांकन, या डॉक्युमेंट्रीलाही मिळाले ऑस्करसाठी नामांकन

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआरमधील 'नाटू नाटु' या फूट-टॅपिंग गाण्याने मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळवले आहे.

ऑस्कर हा चित्रपट जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे. यंदाचा ऑस्कर भारतासाठीही खूप खास आहे कारण एसएस राजामौलीचा आरआरआर, पान नलिनचा छेलो शो, शौनक सेनचा ऑल दॅट ब्रेथ आणि कार्तिक गोन्साल्विसचा द एलिफंट व्हिस्पर्स यासह चार भारतीय चित्रपट २०२३च्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहेत. दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआरमधील ‘नाटू नाटु’ या फूट-टॅपिंग गाण्याने मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळवले आहे. याआधी या गाण्याने गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्येही सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार पटकावला होता.

आरआरआरचे ‘नाटू नाटु’ हे गाणे प्रचंड गाजले. लोकांना हे गाणे खूप आवडले, तसेच या गाण्यावरील राम-चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या डान्सने खूप लोकांची मने जिंकली. या गाण्याचे संगीत एमएम कीरावानी यांनी दिले असून गीते चंद्रबोस यांनी लिहिली आहेत. त्याचबरोबर हे गाणे विशाल मिश्रा आणि राहुल सिपलीगंज यांनी गायले आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा २०२२ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार राम चरण, ज्युनियर एनटीआर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या दोघांशिवाय बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट देखील या चित्रपटाचा एक भाग होते. या चित्रपटाला भारतातच नव्हे तर जगभरातून खूप प्रेम मिळाले. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यात दाखवलेले व्हीएफएक्सही लोकांना आवडले आणि त्यामुळे आरआरआरने प्रेक्षकांची मने जिंकली. आरआरआर २४ मार्च २०२२ रोजी रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर, या चित्रपटाने केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर जगभरातही कमाई केली. रिपोर्ट्सनुसार, एसएस राजामौलीच्या या चित्रपटाने जगभरात १२०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक संपली, ‘या’ प्रमुख मुद्यांवर झाली चर्चा

IND vs NZ 3rd ODI रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ३ वर्षांनंतर हिटमॅनने झळकावले ODI शतक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss