ब्रम्हास्त्र चित्रपट थिएटर मध्ये न पहिल्याचा OTT च्या प्रेक्षकांना होतोय पश्चाताप

ब्रम्हास्त्र चित्रपट थिएटर मध्ये न पहिल्याचा   OTT च्या प्रेक्षकांना होतोय पश्चाताप

रणबीर कपूर आणि आलीआ भट यांचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बॉयकॉट बॉलीवूड या ट्रेंड मुळे प्रेक्षक ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट पाहायला गेले नाहीत . आता हा चित्रपट OTT वर आला आहे , OTT पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ब्रम्हास्त्र हा चित्रपट पहिले थिएटरमध्ये का नाही पहिला अशी प्रतिक्रिया देत खन्त व्यक्त केली आहे, सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर कंगना रानौतने बोललीवूडमध्ये चालणाऱ्या काही गोष्टींचा खुलासा केला त्यानंतर बर्याचश्या प्रेक्षकांकडून बॉलीवूड मधील चित्रपटांना बॉयकॉट करण्यात आलं, म्हणजेच प्रेक्षकांनी बॉलीवूडचे चित्रपट सिनेमागृहात जाऊन न पाहण्याची भूमिका घेतली .

प्रेक्षकांच्या बॉयकॉट बॉलीवूड या भूमिकेला पाहून बॉलीवूड मधल्या काही प्रसिद्ध अभिनेत्यांनी “आम्हालाही बॉयकॉट करा” असे म्हणत प्रेक्षकांची चेष्ठा करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर प्रेक्षकांनी बॉलीवूड चित्रपट सिनेमागृहात जाऊन ना पाहता OTT वर पाहायला सुरुवात केली . पण आताप्रेक्षकांना ब्रम्हास्त्र हा चित्रपट OTT पाहिल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटात वापरलेले व्ह्यूजवल इफेक्टस खूप आवडले . बॉयकॉट ट्रेंड मुले आपण या चित्रपटाचा आनन्द घेऊ शकलो नाही याची प्रेक्षकांना खंत वाटत आहे .

एका प्रेक्षकाने त्याच्या ट्विटर खात्यावरून अस ट्विट केले आहे की “ब्रम्हास्त्र हा एक उत्कृष्ट सिनेमा आहे , त्यामधील वापरलेला कॉन्सेप्ट आणि व्ह्यूजवल इफेक्टस हे उत्कृष्ठ आहेत . कशी मला ते थिएटरमध्ये बघता आले असते. अनेक वर्षांत मी पहिल्यांदा फोन न उचलता घरी चित्रपट पाहिला. मी भाग २ साठी थांबू शकत नाही. अशी प्रतिक्रिया एका प्रेक्षकाने दिली आहे . तसेच दुसऱ्या प्रेक्षकाने ट्विट केले आहे कि”त्यांनी ब्रम्हास्त्र हा चित्रपट रात्री पहिला त्यांना चित्रपट खूप चांगला वाटलं , त्यांना तो खूप आवडला , त्याने बॉलीवूड चित्रपटांना बॉयकॉट केल्याबद्दल माफी मागितली .

हे ही वाचा :

Sania Mirza Post : पती शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटावर टेनिसपटू सानिया मिर्झानं केली पोस्ट शेअर

अब्दुल सत्तरांनंतर रामदास कदमांची जीभ घसरली; अनिल परब यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका

औरंगाबाद दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, आजपासून मला छोटा पप्पू म्हणा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version