spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार वेबसिरीज आणि चित्रपट

फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार वेबसिरीज आणि चित्रपट

कोरोना काळानंतर काही प्रेक्षकवर्ग घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसिरीज पाहण्यास जास्त पसंती देत आहेत.काहीवेळा सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहायला नसेल मिळाला तर तो चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट प्रेक्षक पाहत असतात.गरम्यान आता ओटीटीवर देखील विविध विषयांवर आधारित असे कथा दाखवण्यात येत आहेत.अशातच आता फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा तडका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.चला तर मग पाहुयात या महिन्यात कोणकोणते सिरीज प्रदर्शित होणार आहेत .

सैंधव 2
‘सैंधव 2’ हा सिनेमा 2 फेब्रुवारी 2024 रोडजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांना एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. नवाजुद्दी सिद्दीकीसह या सिनेमात आर्य, श्रद्धा श्रीनाथ, रुहानी शर्मा, एंड्रिया जेरेमिया आणि बेबी सारा मुख्य भूमिकेत आहेत. 

आर्या 3

‘आर्या 3’ ही बहुचर्चित वेबसीरिज 9 फेब्रुवारी 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत या सीरिजचे दोन्ही सीझन सुपरहिट झाले आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत आहेत. सुष्मितासह इला अरुण, सिकंदर खेर, इंद्रनील सेनगुप्ता, विकास कुमार, माया सराओ, गीतांजली कुलकर्णी, श्वेता पसरीचा, वीरेन वजीरानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राम माधवानी यांनी या सीरिजचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.दोन सिरीज हिट झाल्यानंतर आता तिसऱ्या सिरीजवर प्रेक्षकाचं लक्ष लागलं आहे.

भक्षक
भक्षक या सिनेमामध्ये भूमी पेडणेकर, संजय मिश्रा, सई ताम्हणकर आणि आदित्य श्रीवास्तव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 9 फेब्रुवारी 2024 रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये भूमी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. पुलकितने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे.या सिरीजमधुन सामाजिक दृष्ट्या संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ
‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ’ ही सीरिज शीना बोरा हत्याकांडावर आधारित आहे. ही सीरिज 23 फेब्रुवारी 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने नुकतीच या सीरिजची घोषणा केली आहे.या सीरिजची घोषणा केल्यापासून हा सिरीज पाहण्याची प्रेक्षकांची उस्तुकता शिगेला पोहचली आहे.

हे ही वाचा:

आपल्या बापाशी बेइमानी करणारी पहिले अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे : रामदास कदम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात शाहिद कपूर साकारणार शिवरायांची भूमिका?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss