राग आल्यामुळे रणबीरने फेकला चाहत्याचा फोन, सोशल मीडियावर चाहत्यांनी केले ट्रोल

ज्यामध्ये तो खूप रागावलेला दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राग आल्यामुळे रणबीरने फेकला चाहत्याचा फोन, सोशल मीडियावर चाहत्यांनी केले ट्रोल

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor Video) याचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो खूप रागावलेला दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रणबीर थोडासा चिडतो आणि त्यानंतर त्या चाहत्यांचा फोन फेकून देतो. या व्हिडिओने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. यावरून लोक रणबीर कपूरला खूप ट्रोल करत आहेत.

प्रत्यक्षात एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये रणबीर कपूर दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक चाहता रणबीरसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे. रणबीरने आधी त्या फॅनसोबत उभा राहून पोझ दिली, पण काही वेळातच तो मोबाईल फेकताना दिसला. या व्हिडीओमागील सत्य काय आहे, हे अद्याप समोर आले नसले तरी नेटिझन्स मात्र यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही लोक हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगत आहेत, तर अनेकजण याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत.

व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते रणबीरला असभ्य कृत्य केल्यामुळे फटकारत आहेत. बरेच लोक आलिया भट्टला काही मॅन र्स शिकवण्यास सांगत आहेत. तर काही चाहते रणबीर कपूर खूप शांत असल्याचा दावा करत, तो त्याच्या चाहत्यांशी नेहमीच चांगला वागतो, असे म्हणत आहेत. तर काहीजण हे एक हे अॅड शूट असू शकते, असेही म्हणत आहेत. सध्या रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट तू झुठी मैं मक्करच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो लोकांची मने जिंकत आहे. यानंतर तो रश्मिका मंदान्नासोबत ‘एनिमल’मध्ये दिसणार आहे.

हे ही वाचा:

मोरबी पूल कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी केले १२०० पानांचे आरोपपत्र दाखल, ओरेवाचे एमडी जयसुख पटेलांच्या नावाचाही समावेश

भारतात पुन्हा चित्ते येणार, नामिबीयानंतर साऊथ आफ्रिकेशी झाला करार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version