spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नव्या मालिकेच्या माध्यमातून पल्लवी पाटील येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

एका नव्या मालिकेच्या म्हणजेच ‘नवा गडी, नवं राज्य’ या झी मराठीच्या मालिकेच्या माध्यमातून पल्लवी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी चित्रपटातून विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाने पल्लवी पाटीलने तिच्या अनेक चाहत्यांना तसेच प्रेक्षकवर्गाला भुरळ घातली आहे. पण आता एका नव्या मालिकेच्या म्हणजेच ‘नवा गडी, नवं राज्य’ या झी मराठीच्या मालिकेच्या माध्यमातून पल्लवी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीवर आणि सोशल मीडिया प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात पल्लवी पाटीलसोबत ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील राधिका म्हणजेच अनिता दाते देखील असणार आहे.

पल्लावीच्या जिगरबाज मालिकेनंतर तिच्या ‘नवा गडी, नवं राज्य’ या मालिकेच्या माध्यमातून एका नव्या भूमिकेत ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. या मालिकेत पल्लवी आनंदी हे पात्रा साकारणार असून प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे आनंदी ही गावातून लग्न करून आलेली मुलगी आहे. जी रमाचा (अनिता दाते) अर्धवट संसार आपलासा करून पूर्वपदावर आणू पाहत आहेत. या मालिकेत पल्लवी पाटील आणि अनिता दाते यांच्या बरोबर ‘रंग माझा वेगळा’ मालिका फेम बालकलाकार सायिशा भोईर ही रमाच्या मुलीच्या भूमिकेत तर, प्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पल्लवीने म्हटलं, “मराठी चित्रपटात खूप शिकायला मिळालं आणि आता मला एक नवीन संधी मिळाली आहे, ती म्हणजे या सुंदर मालिकेत काम करण्याची. आनंदी हे पात्र रमाचा अर्धवट राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते आणि सगळे आव्हान स्वीकारते. आनंदीचं पात्र साकारताना मला खूप आनंद होत आहे आणि प्रेक्षकांनासुद्धा आनंदीचं पात्र आवडेल अशी अपेक्षा करते.” ‘नवा गडी नवं राज्य’ 8 ऑगस्टपासून, सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी मराठीवर वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

Latest Posts

Don't Miss