Panchayat Season 4 रिलीज डेटचे मोठे अपडेट…कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

पंचायतमधील सचिव असो किंवा प्रधान, हे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना जवळचं वाटतं. या वेब सीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली तेव्हापासून या सीरिजच्या चौथ्या सिझनची जोरदार चर्चा सुरु आहे.

Panchayat Season 4 रिलीज डेटचे मोठे अपडेट…कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिजपैकी पंचायत (Panchayat 4) ही एक लोकप्रिय सिरीज आहे. या सीरिजचे आतापर्यंत तीन भाग प्रदर्शित झाले असून, या तिन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. नुकताच या सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शित झाला होता. पंचायतमधील सचिव असो किंवा प्रधान, हे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना जवळचं वाटतं. या वेब सीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली तेव्हापासून या सीरिजच्या चौथ्या सिझनची जोरदार चर्चा सुरु आहे.

पंचायत सिझन १ आणि सिझन २ नंतर पुढचं सिझन कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर या सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. या तिन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या वेब सीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली तेव्हापासून या सीरिजच्या चौथ्या सिझनची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचप्रमाणे चौथ्या सीझनमध्ये कथानक कसं असेल याचीही उत्सुकता प्रेक्षकांना  लागून राहिली आहे. त्यातच पंचायत ४ च्या रिलीज डेटचे मोठे अपडेट समोर आले आहे. या सीझनमध्ये नक्की काय पाहायला मिळणार हे पाहणंही आता उत्सुकतेचे ठरणार आहे. दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी आधीच खुलासा केला आहे की, त्यांनी पंचायत सिझन ४ आणि ५ वर काम सुरु केले आहे. म्हणजेच लेखकांनी स्क्रिप्ट लिहण्याचे काम सुरु केले आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार नवीन सिझन २०२६ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, पंचायत ४ कधी येणार याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या वेब सीरिजचे शूटिंग ऑक्टोबर २०२४ मध्ये मध्य प्रदेशमध्ये होण्याची शक्यता आहे.

पंचायत ३ मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव यांसारख्या कलाकारांनी  काम केले आहे. मागच्या सीझनमध्ये फुलोरा गावात प्रमुख होण्यासाठी लढतीचा सामना पाहायला मिळाला. पंचायत ४ ची कथा निवडणुकीभोवती फिरणार असून यावेळी रिंकी आणि सचिवजींचा रोमान्स फुलणार की नाही तसेच प्रल्हाद निवडणुकीत भाग घेणार की नाही हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा:

Exit mobile version