जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर पॅनोरमा म्युझिकने रिलीज केले “राधे कृष्ण” हे नवे गाणे

जन्माष्टमीच्या प्रसंगी, पॅनोरमा म्युझिक, निताशा अग्रवाल यांनी गायलेले आणि निखिल कामथ यांनी संगीतबद्ध केलेले त्यांचे नवीन सिंगल "राधे कृष्ण" घेऊन आले आहे.

जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर पॅनोरमा म्युझिकने रिलीज केले “राधे कृष्ण” हे नवे गाणे

राधे कृष्ण

“प्रेम” ही जगातील सर्वात सुंदर आणि शुद्ध भावना आहे. या शब्दाचा विचार करूनच आपल्याला चेहऱ्यावर हसू उमटते आणि मन आनंदून जाते. प्रेमासाठी जर एखादा दुसरा शब्द सांगायचं झाला तर तो शब्द म्हणजे राधा – कृष्ण. राधा आणि कृष्णाचं प्रेम म्हणजे खऱ्या आणि शुद्ध प्रेमाचे प्रतीक आहे. प्रेम का करावं? प्रेम कसं असावं हे राधा – कृष्णाने त्यांच्या प्रेमकथेतून जगाला दाखवून दिलं आहे.

जन्माष्टमीच्या प्रसंगी, पॅनोरमा म्युझिक (Paranoma Music), निताशा अग्रवाल (Nitasha Agrawal) यांनी गायलेले आणि निखिल कामथ (Nikhil Kamath) यांनी संगीतबद्ध केलेले त्यांचे नवीन सिंगल “राधे कृष्ण” घेऊन आले आहे. हे गाणे राधा कृष्णाच्या चिरंतन प्रेमाचे गाणे आहे. तसेच भक्ती आणि शुद्धतेचे सार असलेला हा एक भावपूर्ण आणि सुखदायक ट्रॅक आहे.

जर बासरी हे कृष्णाचे वाद्य असेल तर राधा ही त्या बासरीतून निघणारा सुंदर राग आहे. जशी बासरी आणि माधुर्य एकमेकांना पूरक आहेत त्याचप्रमाणे राधा आणि कृष्णही.”राधे कृष्ण” (Radhe Krishna) हे भावपूर्ण भजन राधा आणि कृष्ण यांच्यातील या बिनशर्त, शाश्वत आणि दैवी प्रेमाविषयी बोलते. या भजनाच्या ओळी कृष्णाची राधाबद्दलची आणि राधेची कृष्णाबद्दलची भक्ती व्यक्त करतात.

भजनाची सुरुवात ही “श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी” (Shree Krishna Govind Hare  Murari) या सर्वात लोकप्रिय भागाने होते, जी खूप लोकप्रिय आहे. परंतु त्यात दोन नवीन श्लोक जोडून या गाण्याचा शेवट करण्यात आला आहे. हे मंत्रमुग्ध करणारे भजन निखिल कामथ (Nikhil Kamath) यांनी संगीतबद्ध केले आहे आणि विमल कश्यप (Vimal Kashyap) यांनी हे भजन गीतबद्ध केले आहे. व्हिडिओमधील आकर्षक नृत्य आणि नृत्यदिग्दर्शन अमृता जोशी (Amruta Joshi) यांनी केले आहे आणि धर्मेंद्र बिस्वास यांनी ते सुंदररीत्या टिपले आहे.

हे ही वाचा:

‘१७७०’ या बहुचर्चित सिनेमाचा मोशन पोस्टर आला प्रेक्षकांच्या भेटीला

Exit mobile version