परिणीतीने राघव चड्ढाला दिल लग्नाचं खास गिफ्ट …

 काही दिवसांपूर्वी चर्चत असलेलं लग्न म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं हे जोडपं

परिणीतीने राघव चड्ढाला दिल लग्नाचं खास गिफ्ट …

काही दिवसांपूर्वी चर्चत असलेलं लग्न म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं हे जोडपं उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. जवळच्या कुटूंबीयांसोबत आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत यांनी आपल्या लग्नाचा विवाह सोहळा पार पडला आहे. जोडपं एकमेकांना काहींना काही भेट वस्तू देत असतात. आता परिणितीन पती राघवला देखील एक अनोखी भेट वस्तू दिली आहे. लग्नासाठी परिणीती चोप्राने एक गाणं रेकॉर्ड केलं आहे.

परिणीती आणि राघव यांच्या उदयपूर मधील शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता ते लग्नबंधनात अडकले असून त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आता परिणीतीने राघव यांना एकदम खास भेट दिली आहे. राघव यांच्या आठवणीत या सॉंग ची ही गोष्ट कायम लक्षात राहणार आहे. २४ सप्टेंबरला लग्नसोहळ्यात ‘ ओ पिया ‘ हे सॉंग परिणीतीने राघव चड्ढा यांच्यासाठी हे गाणं गायलं आहे. हे गाणं सनी एमआर, हरजोत कौर आमि गौरव दत्ता यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. आता चाहते युट्यूबवर हे गाणं ऐकू शकतात अनेकांनी या गाण्यावर कॉमेंट्स केल्या आहेत .

परिणीती आणि राघव लग्नानंतर दिल्लीला गेले आहेत. दिल्ली आणि चंढीगढमध्ये त्यांचं शाही रिसेप्शन होणार होते परंतु आता दिल्लीतील रिसेप्शन रद्द केल्याचं समोर आलं आहे. राघव आणि परिणीती यांचं मुंबईत रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनला दोघांचेही जवळचे मित्रमंडळी सहभागी होणार आहेत. तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील या रिसेप्शनला उपस्थित असणार आहेत. बुधवार ४ ऑक्टोबरला हे रिसेप्शन मुंबईत होणार आहे.

उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदेखील हजर होते. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनाही चाहते सुखी संसारासाठी शुभेच्छा देत आहेत.

हे ही वाचा: 

गुजरात मध्ये कच्छ किनारपट्टी भागातून ८0 किलोचे ड्रग्स जप्त

दमदार स्टारकास्ट असलेल्या “क्लब 52” चित्रपटाचे पोस्टर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version