Pathaan Housefull, शाहरुख खानचा पठाण काश्मिरमध्ये करतोय जादू

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा नवीन चित्रपट पठाण (Pathaan) हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाणं हे वादाच्या भोवऱ्यात सापडलं होत.

Pathaan Housefull, शाहरुख खानचा पठाण काश्मिरमध्ये करतोय जादू

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा नवीन चित्रपट पठाण (Pathaan) हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाणं हे वादाच्या भोवऱ्यात सापडलं होत. या चित्रपटाच्या माध्यामातून शाहरुख खाननं तब्बल ४ वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुखच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं अँडव्हान्स बुकिंग केलं. काही चाहत्यांनी तर अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता पठाणच्या कामगिरींच्या यादीत आणखी एका कामगिरीचा सामवेश झाला आहे. ‘पठाण’ देशातच नव्हे तर जगात कमाईचे नवे विक्रम करत आहे. चित्रपटाच्या एका दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास १०० कोटींचा आकडा पार केला आहे.अश्यातच आता पठाण चित्रपटामुळे काश्मिर खोऱ्यातील (Kashmir Valley) एका थिएटरबाहेर तब्बल ३२ वर्षांनी हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे.

मल्टिप्लेक्स चेन INOX Leisure Ltd ही माहिती दिली आहे. आयनॉक्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करुन काश्मिर खोऱ्यातील थिएटर हाऊसफुल्ल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये दोन चाहते एका चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लावून उभे आहेत. शाहरुख खानचे काश्मीरमध्ये राहणारे चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीत आणि त्याच्यामुळे खोऱ्यात चमक परत आल्याबद्दल ते आभारी आहेत. ‘पठाण’ चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. त्याचबरोबर देशभरातील अन्य चित्रपटगृहांमध्येही जल्लोषाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये प्रेक्षक थिएटरमध्ये ‘पठाण’ पाहताना शिट्ट्या वाजवताना आणि नाचताना दिसत आहेत. ‘पठाण’मध्ये सलमान खानचाही कॅमिओ आहे.

‘पठाण’च्या अखिल भारतीय कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास ६७ कोटींची कमाई केली आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस यांनी पहिल्या दिवशी २७.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जे एकूण संकलनाच्या जवळपास ५० टक्के योगदान देते. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे पठाणच्या दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये आणखी मोठी मजल मारता दिसेल. सुट्टी नसलेल्या दिवशी, पठाणने वॉर, केजीएफ २ आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान यांसारख्या हॉलिडे रिलीजच्या चित्रपटांना मागे टाकत हिंदीमध्ये #१ क्रमांकाची ओपनिंग मिळवली आहे.

हे ही वाचा:

WPL Team Auction महिला आयपीएलमध्ये होणार अदानी विरुद्ध अंबानी लढत, तर इतक्या रुपयांना दोघांनी विकत घेतले संघ

Republic Day 2023, यंदा प्रजासत्ताक दिनानिम्मित व्हाट्सअँप द्वारे द्या शुभेच्छा!

दादरची आग तर विझली परंतु राजकारण तापलं, कालिदास कोळंबकर म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version