Pathaan New Song Release पठाण या चित्रपटामधील ‘Jhoome Jo Pathaan Song’ प्रेक्षकांच्या आलं भेटीस

Pathaan New Song Release पठाण या चित्रपटामधील ‘Jhoome Jo Pathaan Song’ प्रेक्षकांच्या आलं भेटीस

बॉलिवूडचा बादशाह म्हणजे शाहरुख खान याचा पठाण (Pathaan ) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) बरोबर अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसापूर्वी पठाण या चित्रपटाचे Besharam Rang हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता या चित्रपटामधील New Song प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आणि या गाण्याचे नाव ‘Jhoome Jo Pathaan Song’ असे आहे.

गायक Arijit Singh आणि गायिका Sukriti Kakar यांनी पठाण या चित्रपटातील ‘Jhoome Jo Pathaan Song’ हे गं गायलं आहे. या गाण्यामध्ये शाहरुख आणि दीपिका यांचा डान्स आणि केमिस्ट्री दिसत आहे. Jhoome Jo Pathaan Song या गाण्यातील शाहरुखच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून टाकले आहे. त्याच बरोबर शाहरुख आणि दीपिकाचे या गाण्यातील डान्सचे आणि लूकचे चाहते कौतुक करतांना दिसत आहे.

 

‘पठाण’ सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी कमबॅक करणार आहे. ‘पठाण’ या सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाती वाट शाहरुख आणि दीपिकाचे चाहते उत्सुकतेने बघत आहेत.

 

पठाण या चित्रपटानंतर शाहरुख खान हा राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) दिग्दर्शित ‘डंकी’ या आगामी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच बरोबर शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानच्या आगमी चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.

हे ही वाचा :  Uorfi Javed उर्फी जावेदला बिहारमधून धमकावत होता तरुण, मुंबई पोलिसांकडून अटक

 

Exit mobile version