भारताबाहेरही पसरतेय पठाणची क्रेझ, भारत दौऱ्यापूर्वी ‘ह्या’ खेळाडूने शेअर केला पठाण लुकमधील मनोरंजक व्हिडिओ

ज्यामध्ये तो पठाणच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारताबाहेरही पसरतेय पठाणची क्रेझ, भारत दौऱ्यापूर्वी ‘ह्या’ खेळाडूने शेअर केला पठाण लुकमधील मनोरंजक व्हिडिओ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ १ फेब्रुवारीला भारतात पोहोचणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ सुरुवातीला काही दिवस बेंगळुरूमध्ये असेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ नागपूरला कसोटी सामना खेळण्यासाठी रवाना होईल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर एका वेगळ्याच लूकमध्ये दिसला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो पठाणच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटातील गाण्याबाबत त्याने एक पोस्ट टाकली आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खानच्या व्यक्तिरेखेचा चेहरा असून तो दीपिका पदुकोणसोबत रोमान्स करत आहे. वॉर्नरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकदा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यासाठी तो ओळखला जातो. हेच कारण आहे की त्याचे भारतात खूप चाहते आहेत. त्याच्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे.

९ फेब्रुवारीपासून सुरू होणार मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान नागपुरात खेळवली जाणार आहे. दुसरी कसोटी १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणार आहे. तिसरी कसोटी १ ते ५ मार्च दरम्यान धर्मशाला आणि चौथी कसोटी ९ ते १३ मार्च दरम्यान अहमदाबाद येथे खेळवली जाईल. ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल, तर ऑस्ट्रेलिया टीमला चांगल्या फरकाने पराभूत करावे लागेल.

हे ही वाचा:

सुशांतने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न … , दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केला मोठा खुलासा

IND vs ENG Under 19 World Cup : महिला अंडर १९ टी-२० विश्वचषक अंतिम सामना थेट पाहण्याआधी जाणून घ्या ‘ही’ माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version