spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

बॉलीवूड बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या पठाण (pathan) या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आल्यापासूनच या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा बेशरम रंग (Besharam Rang ) हे गाण प्रदर्शित झालं होत. या गाण्यावर सिनेसृष्टीतील मोठ्या दिगदर्शकानी आणि संपुर्ण देशभरातील राजकीय वर्तुळातील नेत्यांनीसुद्धा पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याचा विरोध केला आहे. या गाण्यात वापरण्यात आलेल्या कपड्यांच्या रंगावरून हा वाद पेटला आहे. पण नुकतच अभिनेत्री पायल रोहतगीने (Payal Rohatgi) एका मुलाखतीत जाहीरपणे पठाण चित्रपटाला समर्थन दिले आणि अभिनेत्री सानिलियोनीवर (Sunny Deol) निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानच्या आगामी चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाण चांगलाच चर्चेत आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे देशभरातून या गाण्याचा मोठ्याप्रमाणात विरोध होतो आहे. बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सुरुवातीला या गाण्याचा विरोध केला. आणि त्याच्या पाठोपाठच मध्यप्रदेशराज्यातील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा ( Narottam Mishra ) यांनी तर चित्रपटालाच विरोध केला आहे. त्यांनी बेशरम रंग हे गाणं प्रदर्शित झालं त्यानंतर सांगितलं की ‘गाण्यातील चित्रण आणि पोशाख बदला नाहीतर मध्यप्रदेशात पठाण चित्रपटाला बंदी घालण्यात येईल.’ याच वादामुळे आता ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंड सोशलमिडीयावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. पण या सर्वाना डावलून अभिनेत्री पायल रोहटगीने पठाण चित्रपताच्या बाबतीत वेगळीच भूमिका मांडली आहे. आणि सर्वच लक्ष तिने स्वतःकडे वेधून घेतला आहे. पायल (Payal Rohatgi) ने एका मुलाखतीत शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) पठाण (pathan) चित्रपटावर भाष्य करत सांगितलं की ‘ तिला हे आरोप बिन बुडाचे वाटतात या आरोपांना काहीच अर्थ नासल्याचं पायलने स्पष्ट केलं आहे.तर जर लोक दीपिकाला बेशरम रंग या गाण्यामुळे अश्लील म्हणत असतील तर देशात पॉर्नसारखी गोष्ट तुम्ही कशी सहन करता? इथे आपल्या मनोरंजनसृष्टीत तर एका पॉर्नस्टारला अभिनेत्रीचा दर्जा दिलेला आहे. तिचा उदोउदो आपण करतो असतो. हा दुटप्पीपणा थांबवला पाहिजे. उगाचच भगव्या रंगाचा आधार घेऊन या वादाला आणखी मोठं होण्यापासून रोखलं पाहिजे.”’ असे म्हणत तिने अभिनेत्री सानी लियोनीवर (Sunny Leone) अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

त्यामुळे आता अभिनेत्री पाया रोहतगीला कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागू शकत हे काही सांगता येणार नाही, तसेच पायलच्या या वक्तव्यामुळे पठाण चित्रपटाचा वाद अजून अधिक पेटू शकतो. तसाही पठाण चित्रपटाला भारतातील अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. त्यात आता पायलने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

हे ही वाचा : 

पुण्यात नदीच्या पात्रात पंप सोडताना विजेच्या धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेतील शेवंता करणार या दिग्दर्शकाशी लग्न , हळदीचे फोटो झाले व्हायरल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss