फुलवा आणि सोनाली थिरकल्या लंडन ब्रिजवर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी 'तमाशा लाइव्ह' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी रिलीज झाली असून ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

फुलवा आणि सोनाली थिरकल्या लंडन ब्रिजवर

फुलवा आणि सोनाली थिरकल्या लंडन ब्रिजवर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी ‘तमाशा लाइव्ह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी रिलीज झाली असून ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या सोनाली क्रांती रेडकर दिग्दर्शक आागमी रेनबो या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने लंडन येथे आहे. येथे तिच्यासह कोरिओग्राफर फुलवा खामकर देखील तिच्यासोबत आहे.तमाशा या सिनेमात सोनाली कुलकर्णी  आणि सचित पाटील  हे पत्रकारांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सोनाली चक्क न्यूज अँकर सुद्धा झाली होती.

तसंच चंद्रमुखी चित्रपटातनंतर ‘तमाशा live’ सिनेमाचं गाणं ट्रेंड मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सगळ्या प्रेक्षकांना या ‘रंग लागला’ गाण्याने भुरळ पाडल्याचं दिसत आहे.अनेकजण यावर रिल्स व्हिडीओ बनवताना दिसत आहेत.महाराष्ट्र सोडून चक्क लंडनच्या टाऊन ब्रिजवर हे गिरकी चॅलेंज करताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णीने हे चॅलेंज प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर फुलवा खामकरसोबत परफॉर्म केलं आहे.”लंडनच्या टॉवर ब्रीचवर माझ्या आवडत्या सोनाली कुलकर्णीसह मॅजिक…अशी कॅप्शन देत फुलवा ने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.चित्रपटातील हे गाणे कोरिओग्राफर उमेश जाधव यांनी कोरिओग्राफ केले असून अमितराज यांचे संगीत आहे.

या सिनेमात सोनाली कुलकर्णी  आणि सचित पाटील  हे पत्रकारांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सोनाली चक्क न्यूज अँकर सुद्धा झाली होती. तसंच चंद्रमुखी चित्रपटातनंतर ‘तमाशा live’ सिनेमाचं गाणं ट्रेंड मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सगळ्या प्रेक्षकांना या ‘रंग लागला’ गाण्याने भुरळ पाडल्याचं दिसत आहे.अनेकजण यावर रिल्स व्हिडीओ बनवताना दिसत आहेत.महाराष्ट्र सोडून चक्क लंडनच्या टाऊन ब्रिजवर हे गिरकी चॅलेंज करताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णीने हे चॅलेंज प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर फुलवा खामकरसोबत परफॉर्म केलं आहे.

Exit mobile version