spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवे लक्ष्य मालिकेत दिसणार स्टार प्रवाहच्या मालिकांमधील पोलीस अधिकारी

निष्पाप मुलींना फसवणाऱ्या गुन्हेगारांचा करणार नायनाट

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका विषयांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. स्टार प्रवाहवर ‘नवे लक्ष’ (Nave Lakshya) ही मालिका पोलिसांच्या धाडसाचं कौतुक आणि गुन्हेगारांना जेरबंद करणारी ही मालिका आपलं मनोरंजन करण्यासाठी नेहमी सज्ज असते. नुकतंच या मालिकेने लक्षवेधी वळण घेतले आहे. नवे लक्ष्य मालिकेतील युनिट ९ नवनव्या गुन्ह्यांचा शोधतपास करत असतात. यावेळी युनिट ९ च्या टीमला मिळणार आहे जाबाज पोलिसांची साथ.

हेही वाचा

राज्यातही धर्मांतर विरोधी कायदा आणा, निष्पाप महिलांना न्याय मिळवून द्या नितेश राणेंची मागणी

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील एएसपी कीर्ती, लग्नाची बेडी मालिकेतील एसपी राघव आणि अबोली मालिकेतील सीनियर पीआय अंकुश एका सेक्स स्कॅण्डलच्या तपासासाठी युनिट ९ च्या टीमची साथ देणार आहेत. निष्पाप मुलींना फसवणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी हे पोलीस अधिकारी एकत्र आले आहेत. येत्या रविवारी म्हणजेच २४ जुलैला दुपारी १ वाजता, सायंकाळी ७ वाजता आणि रात्री १० वाजता हा विशेष भाग प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

हेही वाचा

विश्व सुंदरी मानुषी छिल्लर चा नवा सिनेमा

आतापर्यंत या पोलीस अधिकाऱ्यांना आपण त्यांच्या मालिकांमध्ये गुन्ह्यांचा तपास करताना पाहिलं आहे. मात्र नवे लक्ष्य मालिकेच्या निमित्ताने हे सगळे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यामुळे महाएपिसोडची रंगत वाढणार हे नक्की. तेव्हा पाहायला विसरु नका नवे लक्ष्य मालिकेचा महाएपिसोड २४ जुलैला दुपारी १ वाजता, सायंकाळी ७ वाजता आणि रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर.

Latest Posts

Don't Miss