spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बॉलीवूड अभिनेत्यासोबत पूजा सांवतचा जलवा, ‘क्रॅक’ या सिनेमातील गाणं प्रदर्शित

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे.पूजाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे.पूजाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.’दगडी चाळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘लपाछपी’, ‘भेटली तू पुन्हा’ अशा सुपरहिट सिनेमांत काम करून पूजाने अभिनयाचा ठसा उमटवला. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही पूजा झळकली.२०१९ साली प्रदर्शित झालेल्या जंगली या सिनेमात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा पूजा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे.

अभिनेत्री पूजा सावंत आता बॉलीवूड मध्ये आपला जलवा दाखवायला सज्ज झाली आहे.क्रॅक हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.पूजा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.ती तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.पूजाचा चाहता वर्ग देखील बराच मोठा असल्याने तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते पसंती दर्शवतात.

तर नुकतच पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘क्रॅक’ या आगामी सिनेमातील गाण्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत पूजा बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालसोबत थिरकताना दिसत आहे. ‘क्रॅक’ या सिनेमातील ‘रॉम रॉम’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पूजा आणि विद्युतची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पूजाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान क्रॅक या चित्रपटात आपल्याला पूजाला पाहयला मिळणार आहे.

दरम्यान, पूजा अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. पूजा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच पूजाने साखरपुडा केल्याचं सांगितलं होतं.आणि त्यानंतर पूजा तिच्या लग्न विषयाला घेऊन चांगलीचं चर्चेत आली आहे.आता ती लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.प्रेक्षकांना आता पूजाच्या लग्नाची उस्तुकत्ता लागली आहे.

हे ही वाचा:

शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावे उघड करणार: मनोज जरांगेंचा थेट इशारा

पूर्वा कौशिक आणि ‘शिवा’ ची अशी झाली भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss