spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पूनम पांडेच्या विरोधात तक्रार दाखल,कॅन्सरविषया जनजागृती करत मृत्यूची खोटी बातमी देणं पडणार महागात

बॉलीवूड अभिनेत्री ,मॉडेल पूनम पांडे हिचा  २ फेब्रुवारीला मृत्यू झालेली बातमी सगळ्यांसमोर आली आणि एकच खळबळ उडाली.

बॉलीवूड अभिनेत्री ,मॉडेल पूनम पांडे हिचा  २ फेब्रुवारीला मृत्यू झालेली बातमी सगळ्यांसमोर आली आणि एकच खळबळ उडाली, सगळीकडे पूनमचे निधन झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.मात्र अशातच तिच्या मृत्युच्या बातम्यांना पुर्णविराम मिळाला आहे.तिने स्वत: सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत जिवंत असल्याची माहिती दिली आहे.तिच्या निधनाची बातमी ही एक अफवा होती.निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

पूनम पांडेने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,”तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचं शेअर करायचं आहे आणि ते म्हणजे – मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग  झालेला नाही. असे सांगून पुन्हा एकदा चाहत्यांना धक्का दिला. त्यानंतर मात्र तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर तिच्या निधनावरुन मीम्सही व्हायरल झाले होते. पूनमला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएशनच्या वतीनं पूनमवर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

२ फेब्रुवारी रोजी पूनमच्या निधनाची बातमी समोर आली होती. मात्र त्यावेळी देखील तिच्या काही चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी या सगळ्यात (AICWA) पूनमचे काहीतरी सरप्राईज असणार, ती खोटं बोलत आहे अशा शंका देखील त्यावेळी चाहत्यांनी व्यक्त केली होती,आणि अशातच ती शंका खरी देखील झाली.दरम्यान पूनमनं जे काही केले ते चूकीचे असून त्यातून चूकीचा संदेश जात असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यात बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटींचाही समावेश आहे.मनोरंजन विश्वातील अनेकांनी आता पूनमच्या विरोधात राग व्यक्त करत तिच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यात AICWA ने पुढाकार घेत मुंबई पोलिसांनी तिच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

अॅडव्होकेट काशिफ यांनी अभिनेत्री पूनम पांडेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर अभिनेत्रीचे मॅनेजर निकीता शर्मा आणि एजन्सीच्या विरोधात देखील आयपीसी सेक्शन ४१७, ४२०, १२० बी, ३४  गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लोकांची फसवणूक करणे, त्यांच्या भावना दुखावणे, तसेच सर्व्हिकल कॅन्सरच्या नावाखाली स्वताच्या नावाचे प्रमोशन करणे, पब्लिसिटी स्टंट करणे असे आरोप पूनमवर करण्यात आले आहे.AICWA ने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यांनी तसे लेखी निवेदन देखील केले आहे. पूनमनं जे काही केले ते चूकीचे आहे. त्याबद्दल तिला शिक्षा व्हायला हवी. असे त्यांनी त्या निवेदनात म्हटले आहे.दरम्यान आता गुन्हा दाखल करत तिला अटक होणार का? मृत्यूचं केलेलं हे नाटक आता तिच्यावरचं भारी पडणार का ? हे असे अनेक प्रश्न आता सगळ्यांना पडले आहेत.

हे ही वाचा:

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

चिऱ्यांपासून बांधलेलं, कौलारू घर….,मुग्धाने शेअर केला तिच्या कोकणातील सासरच्या घराचा फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss