पूनम पांडेच्या निधनाची बातमी खोटी,व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

बॉलीवूड अभिनेत्री ,मॉडेल पूनम पांडे हिचा काल २ फेब्रुवारीला मृत्यू झालेली बातमी सगळ्यांसमोर आली आणि एकच खळबळ उडाली,मात्र अशातच तिच्या मृत्युच्या बातम्यांना पुर्णविराम मिळाला आहे.

पूनम पांडेच्या निधनाची बातमी खोटी,व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

बॉलीवूड अभिनेत्री ,मॉडेल पूनम पांडे हिचा काल २ फेब्रुवारीला मृत्यू झालेली बातमी सगळ्यांसमोर आली आणि एकच खळबळ उडाली,मात्र अशातच तिच्या मृत्युच्या बातम्यांना पुर्णविराम मिळाला आहे.तिने स्वत: सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत जिवंत असल्याची माहिती दिली आहे.तिच्या निधनाची बातमी ही एक अफवा होती.निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

पूनम पांडेने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,”तुमच्या सर्वांसोबत मला काही महत्त्वाचं शेअर करायचं आहे आणि ते म्हणजे – मी इथेच आहे, मी जिवंत आहे. मला गर्भाशयाचा कर्करोग  झालेला नाही. परंतु, या रोगाचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत”

पूनमने पुढे लिहिलं आहे,”इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच, सर्व्हायकल कॅन्सर देखील पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. लवकर या कर्करोगाचं निदान होणं आणि त्यावर HPV लस घेणं हा त्यावरचा उपाय आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्री आपण केली पाहिजे. या रोगाबद्दल जागरुकता पसरवून एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला यावरील उपायांबद्दल माहिती मिळेल, याची खात्री करुया. चला एकत्रितपणे रोगाच्या विनाशकारी परिणामांचा अंत करण्यासाठी प्रयत्न करूया आणि #DeathToCervicalCancer चा अवलंब करुया”.

हे ही वाचा:

पुनम पांडे जिंवत असल्याचं EX बॉयफ्रेंडचा दावा,घरच्यांचे फोन का बंद ?

बेकायदेशीर मार्गाने स्थापन झालेलं सरकार सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी – Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version