Thursday, July 4, 2024

Latest Posts

लालबागच्या राजाच्या चरणी ‘राजाराणी’ चित्रपटाचं पोस्टर लाँच

ग्रामीण पार्श्वभूमीवरील थरारक प्रेमकहाणी असलेला ‘राजाराणी’ (Rajarani) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या दमाच्या आणि अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी सोमवारी लाँच करण्यात आलं असून, २० सप्टेंबर २०२४ पासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच प्रसिद्ध झोतात आलेला अभिनेता रोहन पाटील (Rohan Patil) आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे (Vaishnavi Shinde) ही जोड़ी पहिल्यांदाच एकत्र राजाराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे(Govardhan Doltade) यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे (Shivaji Doltade) यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम (P. Shankaram), पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे (Vijay Narayan Gavande), गायक आदर्श शिंदे (Adarsh Shinde), हर्षवर्धन वावरे (Harshvardhan Wavre), अनविसा दत्तगुप्ता (Anvita Dutt Guptan), नागेश मोरवेकर (Nagesh Moravekar) हे आहेत तर छायांकन कृष्णा नायकर (Krushna Naikar), एम. बी. अलीकट्टी (M.B.Alikatty) हे आहेत.

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या अनेक प्रेमकथा आजवर अनेक चित्रपटांतून दाखवल्या गेल्या आहेत. मात्र प्रत्येक कथेचं काही ना काही वेगळेपण होतं. ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरवर आग लागलेल्या परिस्थितीत एक तरुण-तरुणी एकमेकांचा हात धरुन असल्याचं दिसतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात इतकं काय थरारक घडलं असेल याची उत्सुकता या पोस्टरमुळे वाढली आहे. म्हणूनच एक थरारक प्रेमकहाणी अशी टॅगलाईन लिहिलेल्या या चित्रपटाची कथा रंजक असणार यात शंका नाही. त्यामुळे सकस कथा, उत्तम कलाकार असलेला ‘राजाराणी’ आता मोठ्या पडद्यावर येण्याची वाट पहावी लागणार आहे.

हे ही वाचा :

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत घेणार निर्णय, अजित पवार यांचे आश्वासन

Lonavala Bhushi Dam Tragedy: पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss