अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाचे पोस्टर आले समोर; चित्रपटात झळकणार ‘हे’ मराठी कलाकार…

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाचे पोस्टर आले समोर; चित्रपटात झळकणार ‘हे’ मराठी कलाकार…

सध्या प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात ती एक अभिनेत्री म्हणून समोर येणारच आहे त्याचबरोबर या चित्रपटाच्या निर्मितीचाही भार तिने उचलला आहे. प्राजक्ताच्या ‘शिवोहम क्रिएशन’ (Shivoham Creation) आणि मंगेश पवार अँड कंपनी यांनी मिळून ‘फुलवंती’ (Phullwanti)ची निर्मिती केली असून बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देणाऱ्या पॅनोरमा स्टुडिओकडून (Panorama Studios) हा सिनेमा सादर केला जात आहे. पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती केल्यामुळे हा सिनेमा प्राजक्तासाठी खास असणार आहे. या सिनेमात प्राजक्ता माळीसोबत इतरही मोठी स्टार कास्ट आहे यामुळे एकाच चित्रपटात दिग्गज कलाकारांना एकत्र काम करताना पाहायला मिळेल. नुकतेच सोशल मीडियावर या सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आले.

या धमाकेदार पोस्टरमधून प्राजक्ता माळीसह चित्रपटात असलेलया इतर कलाकारांचीही नावे समोर आली आहेत. प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनी यांच्याबरोबर प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर असे मराठीतील अनेक कलाकार दिसणार आहेत. प्राजक्तासह या सिनेमात गश्मीर महाजनी ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेते प्रसाद ओक यात ‘बाखरे सावकार नाईक’, ऋषिकेश जोशी ‘पंत चिटणीस’, स्नेहल तरडे यात ‘लक्ष्मी’ या भूमिकेत दिसणार आहेत. तर वैभव मांगले यात ‘मार्तंड भैरवाचार्य’ या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या कलाकारांची सेना ‘फुलवंती’ या चित्रपटातून दिसणार आहे. त्यामुळे इतक्या सर्व कलाकारांना एकाच पडद्यावर एकत्र पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटाच्या रूपात येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच चित्रपटाचे संवाद लेखन हे प्रविण विठ्ठल तरडे, दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे, संगीत अविनाश विश्वजीत, नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव तसेच छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे.

Devendra Fadnavis यांनी कितीही गणितं करू द्या, सगळी गणितं मोडून टाकणार; Manoj Jarange Patil यांचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version