Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

प्राजक्ताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांना प्रचंड आनंद देतात. सध्या महाराष्ट्र्रात एका विनोदी मालिकेची प्रचंड चर्चा आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मालिका सध्या घरा घरात पोहोचली आहे. कॉमेडी स्किट सादर करणारी ही मालिका महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात बघितली जाते. या मालिकेचे महाराष्ट्र आणि भारतासह संपूर्ण जगभरात प्रचंड फॅन्स आहेत. नुकतेच या मालिकेतील अँकर प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने आपल्या सह कलाकारासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेता समीर चौघुलेचा (Samir Choughule) आज (२९ जून) वाढदिवस आहे. याच निमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळी ने खास पोस्ट शेअर केली आहे. समीरच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्तानं त्याच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, ग्धशर्करा योग..! आषाढी एकादशीला तूझा ५० वा वाढदिवस आला. खरचं, सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस. तुझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली आणि मी “वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता” झाले..आणि ही ओळख आयूष्यभर राहील, असं वाटतं. तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस; तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश,प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो.., आणि इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो; ह्याच तूला ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!’ प्राजक्ताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेता समीर चौघुले हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देत असतो. समीर सोशल मीडिया वर प्रचंड सक्रीय असतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो बरोबरच समीरने जग्गू आणि ज्युलिएट, चंद्रमुखी, मुंबई मेरी जान, अजचा दिवस माझा, अ- पेईंग घोस्ट, विकून टाक आणि मुंबई टाईम या चित्रपटामध्ये काम केले आहे.

हे ही वाचा:

एक स्टार दुसरे स्टार को ही समर्थन करेंगे;आलिया सिद्दीकीचा सलमान खानवर निशाणा

मराठी अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे, सचिन सावंत यांचा आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version