spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुमचे मी किती आभार मानू ? प्राजक्ताची पोस्ट चर्चेत

प्राजक्ताचा नुकताच वाय हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्राजक्तासोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे ही देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह राहत असून ती तिचे अनेक पोस्ट तसंच तिचे फोटोज शेअर करत असते. तिचे फोटोज पाहून चाहते नेहमीच घायाळ होत असतात. प्राजक्ताचा नुकताच वाय हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्राजक्तासोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे ही देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय. तर प्राजक्ताने इंस्टाग्रामवर तिचा फॅमिली फोटो शेअर केला आहे. आणि त्या खाली पोस्ट देखील लिहिली आहे.

Prajakta Mali's post viral

की,आई पप्पा तुमचे मी किती आणि कसे आभार मानू ? आम्हां मुलींच्या जन्माचं तुम्हीं फक्त स्वागतच नाही तर सोहळा केलात. हॅशटॅग मी आणि माझ्या भाच्या, हॅशटॅग सेव्ह गर्ल चाईल्ड, वाय चित्रपट पोहचला पाहिजे जीव वाचाला पाहिजे तर स्त्री जन्माचा उध्दार करणारी पोस्ट तसंच तिच्या चित्रपटाचा आशय सर्वसामान्यांनपर्यंत पोहचला पाहिजे म्हणून ही खास पोस्ट आणि फॅमिली फोटो शेअर केला आहे.प्राजक्ताची ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांना तिची पोस्ट आवडल्याचे सांगितले आहे.

अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्राजक्तासह मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधव, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले आणि ओमकार गोवर्धनही दिसणार आहेत. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्राजक्तासह मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधव, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले आणि ओमकार गोवर्धनही दिसणार आहेत. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो आहे.

Latest Posts

Don't Miss