‘धर्मवीर’साठी प्रसाद ओक ला शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान पुरस्कार जाहीर

चित्रपट प्रदर्शनानंतर मिळालेला हा पहिलाच पुरस्कार असल्याचं प्रसाद ओक ने सांगितलं.

‘धर्मवीर’साठी प्रसाद ओक ला शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान पुरस्कार जाहीर

'धर्मवीर'साठी प्रसाद ओक ला शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान पुरस्कार जाहीर

मुंबई: धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर नवीन विक्रम रचला. चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) ला शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान २०२२ हा पुरस्कार मिळाला आहे.
धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेतील अभिनेता प्रसाद ओक ला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली. स्वतः प्रसाद ओक ने पुरस्कारासोबत फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर मिळालेला हा पहिलाच पुरस्कार असल्याचं प्रसाद ओक ने सांगितलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील परीक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक चा या चित्रपटातील अभिनय सर्वांनाच थक्क करणारा होता. संपूर्ण महाराष्ट्राने प्रसादचं कौतुक केलं आहे. अभिनेता प्रसाद ओक सोबत या सिनेमातील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांकडून उत्तम प्रसंशा मिळाली. धर्मवीर आनंद दिघेंच्या कार्याची कीर्ती सर्वदूर पोहचण्याचे काम या चित्रपटातून करण्यात आले.
झी स्टुडिओज, मंगेश देसाई (Mangesh Desai) यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे (Pravin Vitthal Tarde) यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवसापासून थिएटर मध्ये प्रेक्षकांनी जेवढी गर्दी केली ती शेवटच्या आठवड्यात ही कायम राहिली.
Exit mobile version