चिऱ्यांपासून बांधलेलं, कौलारू घर….,मुग्धाने शेअर केला तिच्या कोकणातील सासरच्या घराचा फोटो

मराठी विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणुन मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेसश लघाटे यांना ओळखलं जातं.

चिऱ्यांपासून बांधलेलं, कौलारू घर….,मुग्धाने शेअर केला तिच्या कोकणातील सासरच्या घराचा फोटो

मराठी विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणुन मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेसश लघाटे यांना ओळखलं जातं.दरमयान ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली ही लाडका जोडीने आमचं ठरलं असं म्हणत लग्न गाठ बांधली.सारेगमप पासून सुरु झालेला हा प्रवास लग्नापर्यंत येऊन पोहचला आणि एकमेकांचे जीवनसाथी म्हणुन त्यानी आता त्यांचा पुढील प्रवास सुरु केला.

मुग्धा आणि प्रथमेश कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते नेहमी त्यांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.दरम्यान या दोघांचा ही चाहता वर्ग मोठा असल्याने ,त्यांच्या प्रत्येक पोस्टला चांगला प्रतिसाद मिळत असतो.अशातच मुग्धाने आता तिच्या कोकणातील सासरच्या घराचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे,तसचं प्रथमेशने देखील त्याच्या घराचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुग्धा काही दिवसांपूर्वी अंदमान दौऱ्यावर गेली होती.अंदमानला गेल्यानंतर ती प्रथमेशला किती मिस करत होती हे देखील ती तिच्या पोस्टमध्ये शेअर करत सांगत होती.अंदमानवरुन ती थेट पुण्याला गेली,त्यानंतर ती आपल्या कोकणातल्या गावच्या घरी पोहोचली आहे. मुग्धा आणि प्रथमेश यांनी त्यांच्या स्टोरीवर एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये घरासमोरील गर्द झाडी दिसत आहे तर सगळीकडे थंडीचं धुकं दिसत आहे. ‘थंडीतील अशी ही सकाळची रम्य पहाट’ असं कॅप्शन देत प्रथमेशने त्यांच्या गावच्या निसर्गरम्य वातावरणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तर मुग्धाने त्यांच्या घराच्या बाहेरचा फोटो शेअर केला आहे. चिऱ्यांच्या दगडापासून बांधलेलं घर त्यानंतर घराला कौल असं हे घर मोठमोठ्या फ्लॅटच्या घराला मागे टाकेल असं दिसत  आहे.या फोटोला चाहते लाईक आणि कमेंट्स करत आहेत.

एकूणच लग्नानंतर पुन्हा एकदा प्रथमेश व मुग्धा त्यांच्या गावच्या घरी गेले असल्याचं समोर आलं आहे.काही दिवसांपूर्वी ते गावच्या घरी दत्तजयंतीचा उत्सव करताना दिसले होते. या कार्यक्रमात ते एकत्र गायले होते.दरम्यान आता या दोघाचा लग्नानंतर चा सुखद प्रवास सुरु आहे.

हे ही वाचा:

भाजपने लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपती करायला हवं, संजय राऊत

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version