spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता-सागर पोहचणार सईच्या शाळेत,तर सावनी रचतेय नवं कारस्थान

छोट्या पडद्यावरील प्रेमाची गोष्ट मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत,मालिकेतील कलाकारांवर देखील चांगला प्रतिसाद देत असतात.

छोट्या पडद्यावरील प्रेमाची गोष्ट मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत,मालिकेतील कलाकारांवर देखील चांगला प्रतिसाद देत असतात.टीआरपीच्या यादीत मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.सईच्या प्रेमाकरिता मुक्ता आणि सागरने लग्न केलेलं असतं.मात्र लग्नानंतर देखील त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उत्तार हे येत असतात.मागील एपिसोडमध्ये हर्षने सागरच्या डोक्यात सई त्याची मुलगी नसून स्वत:ची मुलगी असल्याचं भरवलेलं असतं.त्यामुळे तो सईसोबत नीट वागत नसतो.मात्र हे जेव्हा मुक्ताला समझत तेव्हा ती सागरला समझवते.त्यानंतर तो सईसोबत व्यवस्थित वागतो.

आता मालिकेत आजच्या एपिसोडच्या सुरुवातील मुक्ता आणि सागर सईच्या शाळेत जातात. शाळेमध्ये पालक आणि मुलं यांच्यातील संभाषण अधिक चांगले व्हावे याकरता सेशन आयोजित करण्यात आले होते. तिथेही मुक्ता-सागरमध्ये वाद होतात. तर दुसरीकडे सागर-इंद्रा यांनी घरी येऊन सावनीला सुनावल्यानंतर तिच्या रागाचा पारा चढलेला असतो. ती हर्षवर्धनला चांगलंच सुनावते. ती घर सोडून जायच्या तयारीत असते. मात्र हर्ष तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. सागरला हरवण्याच्या नादात दरवेळी हर्ष तोंडावर पडतो आणि अपमान मात्र नेहमी सावनीचा होतो, यामुळे सावनीची चिडचिड होत असते. एवढं होऊनही हर्षच्या डोक्यातून सागरला हरवण्याचं वेड गेलेलं नसतं.

सावनी त्याला म्हणते की सईची कस्टडी सागरला मिळालं हे ठिकाय, पण आदित्य तिच्यापासून दूर होता कामा नये. हर्ष तिला असं काहीच होणार नाही असा विश्वास देतो.दुसरीकडे सागरला समजतं की त्याला सईच्या शाळेत पूर्ण दिवस काढायचा असतो आणि त्यामुळे त्याला ऑफिसमध्ये जाता येणार नसतं. त्याची चिडचिड होते, पण तो सईसाठी थांबतो. तिथे पहिला टास्क दिला जातो की मुलांच्या पालकांपैकी एकाला आपल्या पार्टनरबद्दल बोलायचं असतं. सागर विचार करतो की, ‘लेक्चर गोखले बोलण्याचा चान्स कसा सोडेल’.

मुक्ता जेव्हा सागरबद्दल बोलू लागते तेव्हा त्याचं खोटंखोटं कौतुक करते. त्यात ही त्याला टोमणे मारण्याची संधी ती सोडत नाही. पण ती एक गोष्ट खरी बोलते की, सागरमुळे तिला सई मिळाली. याबाबतीत ती सागरचं कौतुक करते. सईच्या आयुष्यात तिला येऊ दिल्याबद्दल ती सागरचे आभार मानते, तर सईमुळे तिला आई म्हणणारं कोणीतरी आलं याबद्दल ती सईचेही आभार मानते. मात्र जेव्हा मुक्ता-सागर एकमेकांशी बोलत असतात तेव्हा सागर पुन्हा तिच्याशी विचित्र वागतो. शाळेतील दुसऱ्या एका टास्कसाठी आईवडिलांना एकत्र येऊन सहभागी व्हायचं असतं.

दुसरीकडे सावनी या भ्रमात असते की सागर अजूनही तिच्या प्रेमात आहे, म्हणून सागर सारखा सारखा तिच्याघरी येतो. शिवाय मुक्ता सागरचं मन कधीच जिंकू शकत नाही आणि तो माझ्याशिवाय इतर कोणावर प्रेमही करू शकत नाही, असा विचार ती करते. हर्ष आणि याच गोष्टीचा वापर करुन सागरविरोधात कट रचण्याचा विचार करतात.दरम्यान आता सागर आणि मुक्ता कधी एकत्र येणार?ती दोघं प्रेमात पडणार की नाही ? यासाठी प्रेक्षक उस्तुक आहेत.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार अबू धाबीतील पहिल्या मंदिराचे उद्घाटन

PM Modi यांचा राज्यसभेतून हल्लाबोल, जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की मला आरक्षण आवडत नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss