Priya Bapat Birthday Special : प्रिया बापट अभिनयासोबतच ‘या’ कलेत आहे पारंगत…

नाटक,मालिका,चित्रपट,आणि वेब सिरीयस अश्या मनोरंजन क्षेत्रातील सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट(priya bapat). ब्युटीफुल दिसणारी प्रिया आपल्या भूमिकेवर आणि विचारावर नेहमी ठाम असते.

Priya Bapat Birthday Special : प्रिया बापट अभिनयासोबतच ‘या’ कलेत आहे पारंगत…

नाटक,मालिका,चित्रपट,आणि वेब सिरीयस अश्या मनोरंजन क्षेत्रातील सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट(priya bapat). ब्युटीफुल दिसणारी प्रिया आपल्या भूमिकेवर आणि विचारावर नेहमी ठाम असते. तिने केवळ मराठीच नव्हे तर बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटला आहे. प्रिया बापट हि सोशल मीडियावरही सक्रिय असते. अशा प्रिया बापटचा आज वाढदिवस आहे. आज १८ सप्टेंबर ,रोजी प्रियाचा वाढदिवस आहे. प्रिया तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रियाच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती म्हणजे तिचा नवरा उमेश कामात, उमेश आणि प्रियाची लव्हस्टोरी देखील भन्नाट आहे. उमेश आणि प्रिया नेमही एकाविषयी बोलत असतात. अभिनेत्री प्रिया व तिचा नवरा उमेश हे बरेच वर्षे एकमेकांच्या प्रेमात होते. चला तर जाणून घेऊया प्रिया आणि उमेशची लव्हस्टोरी कशी होती……

अभिनेत्री प्रिया बापट हि खूप चांगली अभिनेत्री आहे. हे आपल्यासगळ्यांना माहित आहे. त्याचसोबत ती आणखी एका कलेत पारंगत आहे. प्रिया खूपच चांगली गायिका असून तिने गायनाचे शिक्षण देखील घेतले आहे. प्रिया बापट ने २ वर्ष शुभदा दादरकर यांच्याकडून नाट्य संगीताचे धडे गिरवले आहेत. तसेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका उत्तरा केळकर याच्या कडून देखील तिने संगीत शिकले आहेत.

प्रिया आणि उमेश याचा प्रेमविवाह झाला. त्या दोघांमध्ये ८ वर्षाचं अंतर आहे. प्रिया हि उमेशच्या कामाची चाहती होती . त्यावेळी मात्र प्रिया बारावी मध्ये शिकत होती आणि त्याच वेळी ती त्याच्या प्रेमात पडली. आधी त्याची फॅन,मग प्रेम,मग प्रियसी आणि नंतर बायको असा ह्या दोघांचा प्रेमाचा प्रवास आहे. उमेश आणि प्रिया मध्ये वयाचे जास्त अंतर असल्याने त्या दोघांना नेहमी प्रश्न पडायचा कि प्रेमाचे काय करायचे दोघांच्या मनात प्रेम होत.पण उमेश मात्र पुढे जाण्यासाठी अडखळत होता. त्याशिवाय प्रियाचे वय लहान असल्याने तिच्या घरच्या कढून नकार होता. तरीही प्रिया तिच्या निर्णयावर ठाम होती. प्रियाने एकेदिवशी थेट उमेशला प्रेमाविषयी विचारले. प्रियाने उमेशला ९ ऑगस्ट रोजी ९ वाजता प्रपोस केलं. पण मात्र उमेशने तिला त्यावेळी नकार दिला,तो म्हणाला मला थोडा वेळ दे,मी विचार करून सांगतो. त्यानंतर उमेशने प्रियाला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी १८ सप्टेंबर रोजी होकार दिला. त्यानंतर ते बरेच वर्षे एकमेकांच्या प्रेमात होते. आणि २०११ मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले.

 

Exit mobile version