Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली लेकीची पहिली झलक

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. आई झाल्यापासून ती लेकीसंबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली लेकीची पहिली झलक

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. आई झाल्यापासून ती लेकीसंबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्रियांकाने तिची लेक ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

निक जोनससोबत प्रियांका १ डिसेंबर २०१८ साली लग्नबंधनात अडकली. राजस्थानात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. तर १५ जानेवारी २०२२ रोजी प्रियांका आणि निक आई-बाबा झाले. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी सरोगेसीद्वारे त्यांच्या लेकीचे स्वागत केले.

प्रियांका परदेशात राहत असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्यासंबंधीत प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियांका लेकीसोबत दिवाळीचा सण साजरा करताना दिसून आली. सेलिब्रेशनचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रियांकाने लेकीचा एक फोटो इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. या फोटोत लाडक्या लेकीचा अर्धाच चेहरा दिसत आहे. उबदार टोपीने तिचा चेहरा झाकलेला आहे. तसेच पांढऱ्या रंगाचं एक गोड स्वेटर बाळाने घातलं आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोत तिची लाडकी लेक झोपलेली दिसत आहे. लेकीचा फोटो शेअर करत प्रियांकान ‘आय मीन’ म्हणजेच ‘मला म्हणायचयं’ असं कॅप्शन लिहिलं आहे. मालती मेरी चोप्रा जोनास बेबी स्ट्रॉलरच्या आत एका बाजूला झुकली आहे. बाळाने पांढरा स्वेटर आणि गुलाबी टोपी घातली होती आणि तिच्याभोवती घोंगडी गुंडाळली होती. प्रियंका, जी सहसा तिच्या मुलीचा चेहरा हृदयाच्या इमोजीने संपादित करते, तिने बुधवारी मालतीचा अर्धा चेहरा उघड केला. तिचे डोळे उबदार टोपीने झाकलेले होते. प्रियांकाच्या लेकीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘गोंडस’, ‘गोड बाळ’, ‘मालतीचे ओठ निकसारखे आहेत’, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

हे ही वाचा : 

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version