spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रियंका चोप्रा विकतेय भांडी नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

प्रियंकाने सुरू केलेला नवा होम डेकोर ब्रॅंड. या ब्रॅंडच्या किमती पाहून चाहत्यांनी तिला पुन्हा ट्रोल केले आहे. 

बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा कायमच चर्चेत असते. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडामोडींची माहिती ती आपल्याला चाहत्यांना देत असते. मध्ये ती सरोगसीच्या मुद्द्यावरून ट्रोल देखील झाली होती. त्याला काही महीने उलटताच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण आहे प्रियंकाने सुरू केलेला नवा होम डेकोर ब्रॅंड. या ब्रॅंडच्या किमती पाहून चाहत्यांनी तिला पुन्हा ट्रोल केले आहे.

प्रियंका चोप्रानं नवा ब्रॅंड सुरू केला असून ‘सोना होम’ नावाचं होमवेयर कलेक्शन लाँच केलं आहे. यामध्ये टेबल लिनेन, टेबल क्लॉथ, डिनर सेट, कप यासारख्या गृहउपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. हे कलेक्शन तिनं 22 जून 2022 रोजी लाँच केलं. प्रियंकाने ‘सोना’ नावाने परदेशात हॉटेलही सुरू केलं आहे. तिचा नवा ब्रॅंड तिने तरुण उद्योगपती मनीष गोयल याच्यासोबत सुरू केला आहे.कलेक्शनमधील वस्तूंच्या किंमती ऐकून सगळेच चकित होतील.त्यामुळे चाहते तिला आता ट्रोल करत आहेत.

https://www.instagram.com/reel/CfUOrCGJNiS/?igshid=YmMyMTA2M2Y=

प्रियांकाच्या ‘सोना होम’ मध्ये चहाच्या कपची किंमत 3, 471 रुपये आहे तर बशीची किंमत 5, 365 रुपये आहे. टेबल क्लॉथची किंमत ही 30, 612 तर टेबल रनरची किंमत 14 हजार रुपये आहे. तर 4,733 रुपयांची डिनर प्लेट देखील ‘सोना होम’ च्या कलेक्शनमध्ये आहे. मला एवढं श्रीमंत व्हायचंय की मी, सोना होमचा 30 हजारांचा टेबल क्लॉथ खरेदी करु शकेल’, अशी पोस्ट करत एका नेटकऱ्यानं शेयर केली आहे. अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी पोस्ट वर केल्या आहेत.तर अनेक नेटकऱ्यांनी वस्तूच्या किंमतीवर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.अशा पद्धतीने आता प्रियंकाचा होम डेकोर ब्रॅंड चर्चेत आला आहे.

Latest Posts

Don't Miss