अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा Promo out

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून घराघरात पोहचणारी तेजश्री प्रधान लवकरच आता नव्या मालिकेत दिसून येणार आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केले.

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा Promo out

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहचणारी तेजश्री प्रधान लवकरच आता नव्या मालिकेत दिसून येणार आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केले. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेनंतर प्रेक्षक तेजश्रीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी आतुर होते. त्यातच आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Gosht) या नवीन मालिकेत दिसून येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashri Pradhan) काही दिवसांपूर्वी ती छोट्या पडद्यावर पुन्हा कमबॅक करत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यावेळी या मालिकेचे नाव काय , ती कधी येणार याबाबत काहीही तिने सांगितले नव्हते. त्यातच आता या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. तेजश्रीच्या या नव्या मालिकेचे नाव ‘प्रेमाची गोष्ट’ असे आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुक्ता आणि सागरच्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री प्रधान तर सागरच्या भूमिकेत राज हंचनाळे दिसणार आहे. तेजश्री आणि राज पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये मुक्ता कधीही आई होऊ शकत नाही. पण तिच्या आईला तिच्या लग्नाची खूप उत्सुकता असते. त्यामुळे मुक्ताचे लग्न जुळावे यासाठी ती प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे सागर हा एका मुलीचा वडील आहे. आपली लेक सईला आईसारखं प्रेम देणारं कोणी नाही त्यामुळे तो दुसरे लग्न करण्यासाठी टाळाटाळ करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यामुळे आता सईमुळे ते एकमेकांच्या प्रेमात पडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहावी लागेल.

दरम्यान ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेचा प्रोमो पाहून ही मालिका ‘ये है मोहेब्बतें’ या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमुळे ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

नीरा देवधर धरणात कार कोसळली, तीन जण बुडाले

Delhi-Mumbai Indigo Flight मध्ये महिला प्रवासीचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षाच्या प्राध्यापकाला अटक

मुंबईकरांसाठी आनंददायक! Goregaon-Mulund Link Road चे काम सुरु,आता अंतर होणार कमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version